अगदी प्राचीन काळापासून वस्त्र व वस्त्रोद्योग हे भारतातील समाजजीवनाचे आणि सांस्कृतिक परंपरेचे एक प्रमुख अंग बनले आहे. या उद्योगामध्ये रोजगारनिर्मितीची प्रचंड क्षमता आहे. देशातील साडेतीन कोटी लोकांना वस्त्रोद्योग रोजगार उपलब्ध करून देतो. यातील बहुतांश रोजगार हे ग्रामीण व मागासलेल्या भागांत आहेत. देशाच्या एकूण परकीय चलनाच्या मिळकतीपकी सुमारे २७% पेक्षा अधिक परकीय चलन वस्त्रोद्योग आजपर्यंत मिळवून देत आला आहे.
 हा एकमेव उद्योग असा आहे, की जो संपूर्णपणे स्वावलंबी आहे आणि ज्यामध्ये मूल्यवृद्धीची साखळी परिपूर्ण आहे. सुतापासून कापड बनवणे हे जसे अत्यंत महत्त्वाचे पाऊल होते तसेच प्राण्याच्या त्वचेचा उपयोग करून वस्त्रनिर्मिती होऊ शकते याचा शोध लागणे हेही एक मोठे पाऊल होते. कपडय़ासाठी लागणारे हे तंतू मिळवण्यासाठी सर्वात मुबलक केस असलेला व अतिशय सहजपणे पकडला जाऊ शकणारा तसेच पाळीव प्राणी होऊ शकणारा प्राणी म्हणजे मेंढी. म्हणून मेंढीचे केस ज्याला आपण लोकर म्हणतो हा वस्त्रोद्योगात वापरला गेलेला सर्वात पहिला धागा, कापूस नव्हे. रेशीम व कापूस यांचा वापर लोकरीच्या वापरानंतर काही हजार वर्षांनंतर सुरू झाला.
 मोहेंजोदडो व हड्डप्पा येथील उत्खननात कापसापासून तयार केलेले कपडे व दोर यांचे अवशेष सापडले होते. ही संस्कृती सुमारे ३००० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. त्या वेळेपासूनच कापसापासून तयार झालेल्या विविध प्रकारच्या कापडांचे उत्पादन करणारा व जगातील इतर देशांना निर्यात करणारा एक प्रमुख देश म्हणून ओळखला जाऊ लागला. ढाक्याच्या मलमलीसारखे जगातील सर्वात तलम वस्त्र भारतात तयार होऊ लागले. रेशीम व लोकर यांची निर्यात व्हायला लागल्यामुळे भारतात श्रीमंती आली.
 इंग्लंड, जर्मनी, रोम, ग्रीस, चीन इत्यादी देशांतील प्रवाशांनी ख्रिस्तपूर्व काळापासून सतराव्या शतकापर्यंत दिलेल्या भेटींमध्ये भारतातील तयार केलेल्या कपडय़ांबद्दल गौरवोद्गार आढळतात.
 हीच परंपरा आजही सुरू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकरी सुताची कापडाची आणि तयार कपडय़ांची २०१२-१३ मधली निर्यात इटलीला रुपये १६१ कोटी, इंग्लंडला रुपये १०२ कोटी, तर अमेरिकेला रुपये ३३ कोटी अशी होती. त्याच वर्षांत काप्रेटची निर्यात (रेशीमखेरीज) अमेरिकेला २२३० कोटी, जर्मनीला ६१० कोटी, तर इंग्लंडला रुपये ४९५ कोटी इतकी होती. या आकडेवारीवरून वस्त्रोद्योगाचे देशाच्या निर्यातीतील स्थान स्पष्ट होते.
चं.द. काणे, इचलकरंजी ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – भोपाळची कुदसिया बेगम
nav02भोपाळ संस्थानच्या कारभाराला १८१९ सालापासून वेगळेच आणि अनपेक्षित वळण लागले. मध्य भारतातील या संस्थानचा पुढच्या शतकभराचा कारभार स्त्री राज्यकर्त्यांनी म्हणजेच बेगमांनी पाहिला. झाले असे की, १८१९ मध्ये तत्कालीन नवाब नझर मोहम्मद खान याचा आठ वर्षांचा पुतण्या गोळ्यांनी भरलेले पिस्तूल हाताळत असताना चूकून चाप ओढला गेला आणि त्यातून सुटलेली गोळी शेजारी बसलेल्या नवाबाचा काळ ठरली! नवाबाच्या अकस्मात मृत्युमुळे त्याच्या नातेवाइकांमध्ये भोपाळच्या गादीवर हक्क सांगण्यासाठी अहमहिका लागली. अशावेळी अनपेक्षित घडले! नवाबाची १९ वर्षांची विधवा बेगम कुदसिया आपल्या तीन वर्षांच्या मुलीला पोटाशी धरुन दरबारात आली आणि आपल्या मुलीचा नवाबपदी बसण्याचा हक्क सांगू लागली.
भोपाळच्या गादीवर तो पर्यंत कोणाही स्त्रीने राज्य केले नव्हते आणि त्यात भर म्हणजे कुदसिया बेगम त्या काळी गर्भवती होती. नातेवाईकआणि इतर दरबारी, मुस्लीम धार्मिक नेते यांनी या गोष्टीला विरोध केला पण बेगमच्या आवेशापुढे कोणाचे चालले नाही.
कुदसिया तिच्या तीन वर्षांच्या मुलीस नवाबपदी बसवून स्वत रीजंट (काळजीवाहू) म्हणून कारभार करू लागली. सुरुवातीस कंपनी सरकारचाही या गेष्टीस विरोध होता. भोपाळची ही बेगम प्रशासक अशिक्षित असूनही शूर आणि अनावश्यक परंपरा झुगारून देणारी, बुरखा (पर्दा) पद्धत न जुमानणारी होती. ‘गोहरजान’ या नावाने लोकप्रिय झालेल्या कुदसिया बेगमने मुलगी वयात येईपर्यंत कारभारी म्हणून काम केले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

Fossils of massive prehistoric snake found in Gujarat
हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; का आहे हे संशोधन महत्त्वाचे?
caste politics in uttarakhand
ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती