रशियातील प्रमुख राजसत्तांची राजधानी बाराव्या शतकापासून मॉस्को येथेच होती. पुढे पराक्रमी आणि कर्तृत्ववान झार पीटर द ग्रेट याने सेंट पीटर्सबर्ग हे शहर वसवून आपली राजधानी मॉस्कोहून या नव्या शहरात हलवली. इ.स. १७१२ ते १९१७ या काळात मॉस्को हे राजधानीचे शहर न राहता केवळ रशियन राज्य प्रदेशातले एक महत्त्वाचे शहर बनून राहिले. मार्च १९१७ मध्ये रशियन क्रांती होऊन मॉस्को येथे परत राजधानी नेण्यात आली. इतर अनेक युरोपियन देशांप्रमाणे मॉस्को शहरातही इ.स. १६५४ आणि १७७१ या वर्षांमध्ये प्लेगच्या साथीने मोठाच हाहाकार उडवला. या दोन वर्षांमध्ये साधारणत: दीड लाख मॉस्कोवासी या आजाराला बळी पडले. या मधल्या काळात, १८१२ साली नेपोलियनने आपल्या प्रबळ फौजेनिशी आक्रमण केले आणि त्याने रशियात प्रवेश केला, त्या वेळी फ्रेंच फौजेचे सामथ्र्य पाहून रशियन सन्याने आपल्या प्रदेशातली पिके जाळून, अन्नधान्याचे साठे नष्ट करून फ्रेंच सन्यावर गनिमी हल्ले करण्याचे तंत्र अवलंबिले. अनेक अडचणी आणि अन्नाच्या तुटवडय़ातही नेपोलियन आणि त्याची फ्रेंच फौज कशीबशी मॉस्कोपर्यंत पोहोचली. परंतु ते येण्यापूर्वीच मॉस्कोवासीयांनी शहरात अनेक ठिकाणी आगी लावल्या. नेपोलियन मॉस्कोत पोहोचला त्या वेळी निर्जन झालेल्या त्या शहरातून ठिकठिकाणी धुराचे लोट बाहेर पडत होते. आक्रमण करून प्रदेशावर कब्जा करायचा आणि सर्व फौजेचा खर्च पराजित राज्यांकडून वसूल करायचा, अन्नधान्य आणि इतर रसदही पराजिताकडूनच घेण्याचा नेपोलियनचा पायंडा होता. मॉस्कोत प्रवेश केल्यावर तत्कालीन रशियन सम्राट झार अलेक्झांडर प्रथम आपल्याकडे  युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवेल अशी अपेक्षा नेपोलियनची होती. अशा प्रस्तावाची वाट पाहत नेपोलियन दोन महिने मॉस्कोत तळ ठोकून बसला. परंतु झारने धूर्तपणे तसे न करता तो सबेरियात निघून गेला. खाद्य सामग्रीची टंचाई आणि थंडी यांनी बेजार होऊन अखेरीस नेपोलियनने माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. तो आणि त्याची सहा लाखांची फौज अन्नपाण्यावाचून, गोठलेल्या प्रदेशातून कशीबशी रशियन सीमा पार करून फ्रेंच हद्दीत पोहोचली, परंतु सहा लाखांपकी पाच लाख सनिक मृत्युमुखी पडून लाचार होऊनच!

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com 

 

भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ : डॉ. फादर एच. सांतापाऊ

रॅव्हॅरॅट फादर हरमेनेगिल्ड सांतापाऊ यांचा जन्म ५ डिसेंबर १९०३ साली लॉ गॅलेरा स्पेन येथे झाला. त्यांनी वयाच्या  सोळाव्या वर्षी सोसायटी ऑफ जिजसमध्ये प्रवेश केला. स्पेन आणि लंडन येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यावर १९२७ साली रोममध्ये ग्रेगोरीयन विद्यापीठाची पी.एचडी. डिग्री मिळवली. १९२८ साली सांतापाऊ भारतात आले आणि शालेय शिक्षक म्हणून काम करू लागले. हे करीत असताना त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला.

१९३६ ते १९४० फादर सांतापाऊ यांनी इम्पिरियल कॉलेज ऑफ सायन्स आणि तंत्रज्ञान, लंडन येथून बी.एस्सी. ऑनर्स आणि नंतर वनस्पतिशास्त्र या विषयात पी.एचडी. प्राप्त केली. काही काळ त्यांनी रॉयल बॉटॅनिकल गार्डन क्यू, इंग्लंड येथे वनस्पती संग्रहालयात काम केले.

१९४० साली भारतात परतल्यावर फादर सांतापाऊ यांनी सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथे शिक्षक म्हणून काम केले. त्यांना नेहमीच वनस्पती शोध आणि सर्वेक्षण यांची तीव्र आवड असल्यामुळे त्यांनी भारतातील आणि परदेशातील वनस्पतींचा अभ्यास केला. जेव्हा भारत सरकारने ‘बॉटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले तेव्हा सांतापाऊ यांना प्रमुख वनस्पतितज्ज्ञ म्हणून नेमले. त्यांनी १९६१ ते १९६८ पर्यंत बॉटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाचे संचालक म्हणून काम केले.

फादर सांतापाऊ निवृत्त झाल्यावर सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये परत आले आणि मृत्यूपर्यंत काम करीत राहिले.  फादर सांतापाऊ यांनी भारतातील वनस्पती सर्वेक्षणाचे काम केले. भारतातील अनेक वनस्पतींचे लॅटिन नामकरण केले. फ्लोरा ऑफ सह्य़ाद्री, फ्लोरा ऑफ पुरंदर, फ्लोरा ऑफ सौराष्ट्र, ऑíकडस् ऑफ बॉम्बे, डिक्शनरी ऑफ फ्लॉवरिंग प्लँट्स ऑफ इंडिया ही काही प्रमुख पुस्तके त्यांनी ए. एन. हेन्रींसोबत लिहिली.

फादर सांतापाऊ यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. ‘ऑर्डर ऑफ अल्फान्सेस दी वाइज’ हा स्पेन सरकारचा सन्मान, १९६१ साली बिरबल सहानी सुवर्णपदक, १९६७ साली भारत सरकाराने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्यांना मराठी भाषेचे ज्ञान होते. पश्चिम घाटातील अनेक वनस्पतींची मराठी नावे ज्ञात होती.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org