कोणाही मराठी भाषिकाला खूप अभिमान वाटावा अशी एक महत्त्वपूर्ण घटना १९७४ मध्ये मराठी साहित्यजगात घडली. मराठीतील थोर साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर ऊर्फ भाऊसाहेब खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीला सर्वश्रेष्ठ भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार १९५८ ते १९६७ या कालावधीत भारतीय भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या सर्जनात्मक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती म्हणून ‘ययाति’  कादंबरीसाठी घोषित करण्यात आला. मराठी साहित्याचा प्रथमच अशा प्रकारे सन्मान झाला. मराठी भाषेचा, लेखकांचाही बहुमान झाला.

११ जानेवारी १८९८ रोजी पौषात अंगारकीला, सांगली येथे खांडेकरांचा जन्म झाला. त्यांचे नाव ‘गणेश’ ठेवण्यात आले. त्यांचे बालपण, शालेय शिक्षण सांगलीत झाले. त्यांचे वडील आत्मारामपंत हे त्या वेळी सांगली संस्थानात मामलेदार होते. सुप्रसिद्ध नाटककार गोविंद बल्लाळ देवल हे खांडेकरांच्या वडिलांचे मित्र होते. देवलांची नाटके, त्यांच्याकडील अनेक पुस्तके खांडेकरांनी लहानपणीच वाचली. लहानपणापासूनच त्यांना वाचनाचे आणि क्रिकेटच्या खेळाचे वेड होते.

pune special court to pronounce verdict in narendra dabholkar murder case on may 10
दाभोलकर हत्या खटल्याचा निकाल १० मे रोजी; सीबीआय, बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम
first case registered for violation of code of conduct in mira road
मिरा रोड येथे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

या सांगली गावानेच खांडेकरांना रामायण-महाभारतातल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान दिला,  सांगलीने समाजसुधारणेविषयी-अन्यायाविषयी मनामध्ये खळबळही निर्माण केली. दलितांवर होणारा अन्याय, त्यांना भोगावे लागणारे विषमतेचे आयुष्य खांडेकर लहानपणापासून पाहत होते. पुढे आपल्या साहित्यातून या समाजस्थितीचे चित्रण वेळोवेळी त्यांनी केलेले दिसते.

‘वाचन हे साऱ्या सुखदु:खाचा विसर पाडणारे गुंगीचे औषध आहे’- असे त्यांना वाटत असे. हाताला लागेल ते कोणतेही पुस्तक, मग ते ‘शनिमाहात्म्य’ असो की, ‘अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी’ असोत, वाचायला हवे. देवलांचे ‘शारदा’ नाटक त्यांना पाठच झाले होते. इंग्रजी चौथी, पाचवीत असताना सारा शेक्सपीअर भाऊंनी वाचला होता. डॉ. केतकरांच्या ज्ञानकोशाचे सारे खंड त्यांनी संपूर्णपणे वाचून काढले होते. वाचता, वाचता, लिहिण्याचा प्रयत्न सुरू झाला.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

 

हवा प्रदूषकांचे नमुने घेण्याच्या पद्धती

हवेतील वायुरूप प्रदूषकांमध्ये मुख्यत्वेकरून सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन डाय ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड इत्यादींचा समावेश होतो.

वायुरूप प्रदूषकांचे नमुने घेण्याच्या पद्धतींपकी ४ पद्धती पुढीलप्रमाणे  –

१. कोल्ड ट्रॅिपग :  हवेतील वायुरूप प्रदूषकांना थंड करून संग्रहित करण्याची ही पद्धत आहे. यामध्ये तापमानाची पातळी (बर्फात) शून्य अंश सेल्सिअस ते (द्रवरूपी नायट्रोजनमध्ये)  – १९६० सेल्सिअस (ऋण १९६ अंश सेल्सिअस)  इतकी कमी असते. या पद्धतीचा उपयोग न विरघळणारे,  बाष्प, हायड्रोकार्बन्स तसेच किरणोत्सारी वायुरूप प्रदूषकांचे नमुने गोळा करण्यासाठी केला जातो.

२. शोषण पद्धती : यामध्ये प्रदूषके ज्या द्रावणात द्रावणीय असतील, त्या द्रावणाचा उपयोग करून प्रदूषके त्या विशिष्ट द्रावणात शोषून घेतली जातात. योग्य नमुना गोळा करण्यासाठी हवेच्या प्रवाहाचा वेग आणि शोषण होण्यासाठी दिला जाणारा वेळ महत्त्वाचे असतात. पाणी, तेल, अल्क आणि आम्ल यांचा शोषक द्रावण म्हणून वापर करण्यात येतो. या पद्धतीमध्ये स्क्रबर, काचेचे इिम्पजर्स यांचा शोषण साधने म्हणून उपयोग केला जातो. सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन डाय ऑक्साइड, अमोनिया यांसारख्या प्रदूषकांचे नमुने या पद्धतीने गोळा करण्यात येतात. साधारणत: २४ तासांचे नमुने जमविण्याकरिता दर चार तासांसाठी एक असे ६ इिम्पजर्स वापरले जातात.

३. अधिशोषण (अ‍ॅडसॉर्पशन) पद्धती :  या पद्धतीमध्ये अधिशोषकावर जमा झालेला थर गोळा करतात. प्रदूषित हवेतील वायू आणि बाष्पाचे नमुने सक्रियीत (अ‍ॅक्टिव्हेटेड) कोळसा, कार्बन, अ‍ॅल्युमिना तसेच सिलिका जेल इत्यादी प्रकारच्या अधिशोषकावर गोळा करण्यात येतो. अधिशोषित झालेली प्रदूषकाची मात्रा अधिशोषकाचे पृष्ठफळ, त्याच्या भौतिक-रासायनिक गुणधर्मावर तसेच नमुना गोळा करतानाच्या तापमानावर आणि दाबावर अवलंबून असते. हवेतील बेन्झिनसारख्या बाष्पनशील कार्बनी संयुगांचे मोजमापन या पद्धतीने करण्यात येते.

४. स्वयंचलित उपकरणे : या पद्धतीमध्ये वायूंचे नमुने ठरावीक वेगाने उपकरणात खेचल्या जातात व त्यानंतर सल्फर डाय ऑक्साइड आणि ओझोनच्या मोजमापनाआधी स्क्रबरमधून तर नायट्रोजन डाय ऑक्साइडच्या मोजमापनासाठी परिवर्तकामधून (कन्व्हर्टर) पाठविण्यात येतात. त्यानंतर सल्फर डाय ऑक्साइडचे मोजमापन अतिनील प्रतिदीप्ती (अल्ट्राव्हायोलेट फ्लोरसन्स) तर नायट्रोजन डाय ऑक्साइड, ओझोन व अमोनियाचे मोजमापन रासायनिक दीप्ती (केमिल्युमिनसन्स) पद्धतीने केले जाते.

मिहिर हेर्लेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org