शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांच्यावर मंगळवारी दुपारी १० ते १५ जणांच्या अज्ञात जमावाने सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यामध्ये राम गावडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर भोसरीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोळ्याला जबर दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आळंदी-मरकळ रस्त्यावर गावडे यांचे घर आहे. मंगळवारी दुपारी ते घराबाहेर उभे असताना १० ते १५ जणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. कोयत्याच्या साह्याने त्यांच्यावर वार करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, याप्रकरणी तपास करण्यात येतो आहे. व्यावसायिक वादातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.

MLA Ganpat Gaikwads wife campaigns against Shinde attends rally with Vaishali Darekar
आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीचा शिंदेंविरोधात प्रचार, वैशाली दरेकरांसोबत रॅलीत सहभागी
dharashiv, show of strength dharashiv
धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन
Suresh Mhatre alleges that Union Minister Kapil Patil is involved in taking action on candidate godowns in Bhiwandi
भिवंडीतील उमेदवाराच्या गोदामांवर कारवाई ? केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा हात असल्याचा सुरेश म्हात्रे यांचा आरोप
devendra fadnavis
इंदापूरमधील नाराजीवर मनोमीलन सभेचा उतारा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मेळावा