मंगळवार पेठेतील पारगे चौक भागात कारवाई

देशी बनावटीचे पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या अहमदनगरमधील एका तरुणाला पोलिसांनी पकडले. मंगळवार प् ोठेतील पारगे चौक भागात ही कारवाई करण्यात आली.

Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
Seven Somali pirates arrested are minors Special Courts order of inquiry
अटक करण्यात आलेले सात सोमाली चाचे अल्पवयीन? विशेष न्यायालयाचे चौकशीचे आदेश

सुनील भुजबळ (वय ३०, रा. कोपरगाव, अहमदनगर)असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मंगळवार पेठेतील पारगे चौक भागात एकजण पिस्तूल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई अजय शितोळे यांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे सापळा लावून भुजबळला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश चव्हाण, उपनिरीक्षक नितीन अतकरे, सुशांत लोणकर, दत्तात्रय येळे, संतोष काळे, नवनाथ भोसले, बाळासाहेब मांगले, अनिल शिंदे, गणेश कोळी, साहिल शेख यांनी ही कारवाई केली.