‘पीएमआरडीए’ला प्रारूप आराखडय़ाचे सादरीकरण

शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी मेट्रोचे काम प्रगतीपथावर असतानाच मेट्रो मार्गिकांच्या विस्तारीकरणाचाही विचार विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि जागरूक नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन सुरू केला असून जागरूक नागरिकांच्या या गटाने भविष्यातील रेल्वे आणि मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रारूप आराखडा आणि नकाशा तयार केला आहे. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) विकास योजना राबविताना आलेले अडथळे लक्षात घेऊन हा आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
houses, MHADA, Goregaon, houses Goregaon,
पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत, गोरेगावमध्ये मध्यम आणि उच्च गटासाठी म्हाडाची ३३२ घरे

पुणे आणि िपपरी-चिंचवड शहरात मेट्रो प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यात काम सुरू होताच मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरण करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे भविष्यात मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण होणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. या पाश्र्वभूमीवर वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने आणि मेट्रो तसेच रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी जागा मिळविण्याच्या प्रक्रियेत पीएमआरडीएला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सिटीझन फॉर पीएमआरडीए (सी-पीएमआरडीए) या जागरूक नागरिकांच्या गटाने वाहतुकीचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. त्यात मेट्रोच्या विस्तारीकरणाचे मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. या आराखडय़ातील सूचनांची पीएमआरडीएने अंमलबजावणी केल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात समाविष्ट होणाऱ्या गावांमधील नागरिकांनाही मेट्रोचा प्रवास अनुभवता येणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गिकांचे काम सध्या सुरु झाले आहे. या दरम्यान  शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावर मेट्रो प्रकल्प होणार आहे. त्यामुळे भविष्यात मेट्रो आणि रेल्वे सेवांचे विस्तारीकरणही होण्याची दाट शक्यता आहे. या धर्तीवर पीएमआरडीएकडून सी-पीएमआरडीएच्या या गटाकडे काही सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार प्रारूप आराखडा करून त्याचे सादरीकरण पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. सी-पीएमआरडीएकडून सादर करण्यात आलेल्या आराखडय़ाची माहिती महामेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

‘वाहतुकीच्या दृष्टीने विविध बाबींचा समावेश असलेल्या या आराखडय़ात पुढील साठ वर्षांच्या नियोजनाच्या दृष्टीने काही मार्ग प्रस्तावित आहेत. भविष्यात वाहतूक सेवांच्या उभारणीत पीएमआरडीएची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. वाहतुकीचे विविध प्रकल्प राबविताना पीएमआरडीएला जागा मिळविण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. विविध योजनांची अंमलबाजवणी करण्यास मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणालाही (एमएमआरडीए) कित्येक वर्ष लागली होती. ही बाब लक्षात घेऊन पुणे महानगर क्षेत्रासाठी रेल्वे आणि मेट्रो मार्गिकांच्या विस्तारीकरणाचे मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत,’ असे लिमये यांनी सांगितले. मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सुरु असलेल्या दोन मार्गिकांचे विस्तारीकरण शक्य आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिका क्रमांक एकचा निगडी-मोशी-चाकण आणि कात्रज पर्यंत विस्तार करता येऊ शकतो. नगर रस्तामार्गे रामवाडी ते वाघोली पर्यंतही मेट्रो मार्ग होऊ शकतो. भविष्यात  नियोजन केल्यास सिंहगड रस्ता, सहकारनगर, कोंढवा-उंड्री, हडपसर, खराडी भागातही मेट्रो जाळे उभारता येईल, अशाही सूचना केल्या आहेत.

‘सूचनांचा विचार करू’

सी-पीएमआरडीएमधील तज्ज्ञांनी दिलेल्या या आराखडयातील सूचनांचा  निश्चितपणे विचार केला जाणार आहे. मेट्रो, विकास आराखडा आणि प्रस्तावित वर्तुळाकार मार्गासाठी या सूचनांचा समावेश करण्यात येईल, अशी माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.