दीड हजारांवर थल्यांतून थंडगार पाण्याचे वाटप; उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत

एक महिन्यापूर्वी रिक्षा पंचायतीच्या वर्धापन दिनी फिरती पाणपोई हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला. तत्कालीन वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी पाणी थंड करणारी थली रिक्षाला बांधून या उपक्रमाचे उद्घाटन केले होते. पुणेकरांनी या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले असून पुण्यातील विविध मंडळे, संस्था आणि लोकप्रतिनिधींनीही त्यांच्या भागातील रिक्षाचालकांना थंड पाण्याच्या पिशव्या वाटण्याचा उपक्रम सुरू केला आहे. अरण्येश्वर, सहकारनगर भागातील सामाजिक कार्यकत्रे नितीन कदम आणि नगरसेविका अश्विनी कदम यांनी त्यांच्या परिसरातील ३०० रिक्षांमध्ये फिरत्या पाणपोईची सोय नुकतीच करून दिली. या रिक्षाचालकांना रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांच्या हस्ते पाण्याच्या पिशव्यांचे वितरण करण्यात आले. फिरत्या पाणपोईंची संख्या वाढत असून सुमारे दीड हजारांवर फिरत्या पाणपोया तहानलेल्यांची तृष्णा शांत करत आहेत.