‘लोकसत्ता आरोग्यभान’ वार्षिकांकाचे प्रकाशन; डॉ. सुपे, वैद्य खडीवाले यांची उपस्थिती

सुदृढ आरोग्य ही आयुष्यातील खरीखुरी संपत्ती कशी राखावी, याचे अतिशय मौलिक मागदर्शन अनुभवी तज्ज्ञांकडून ऐकण्याची संधी ठाणेकरांना शुक्रवारी ‘लोकसत्ता’ने उपलब्ध करून दिली आहे. ‘लोकसत्ता आरोग्यभान’ या वार्षिकांकाच्या प्रकाशनानिमित्त आज, शुक्रवार २३ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता कांती विसारिया सभागृहात मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे व आयुर्वेदतज्ज्ञ प. य. वैद्य खडीवाले उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

आरोग्याकडे जाणता-अजाणता दुर्लक्ष केले जात असल्याने कमी वयातच आजारांना सामोरे जावे लागणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तरुण वयातच आरोग्याकडे लक्ष दिल्यास हे जाणार टाळता येऊ शकतात. त्यामुळे आरोग्याविषयी जागृती वाढविण्याच्या हेतूने आरोग्यविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन ‘लोकसत्ता आरोग्यभान’ या वार्षिकांकात आहे. या अंकाचे प्रकाशन आयुर्वेदतज्ज्ञ प. य. वैद्य खडीवाले व मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता कांती विसारिया सभागृह, महर्षी कर्वे रस्ता, गावदेवी मैदानाजवळ, ठाणे (प.) येथे होईल. या प्रकाशनसमारंभात या दोन्ही तज्ज्ञांकडून आरोग्याविषयी मार्गदर्शनही केले जाणार आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार कोणताही विचार न करता आहार घेत असताना अनेक विकार जडतात. आहार आणि पोटाचे विकार यांचा आरोग्याशी असलेला घनिष्ठ संबंध डॉ. अविनाश सुपे मांडणार आहेत. केवळ औषधे नव्हे तर दिनचर्येत योग्य ते बदल करून आरोग्य कमावता व सांभाळता येते हे आयुर्वेदाचे तत्त्व वैद्य खडीवाले उलगडून सांगतील. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

‘युआरफिटनेस्ट’ हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक असून ‘साने केअर’ हे हार्ट केअर पार्टनर आहेत. तसेच हा कार्यक्रम पॉवर्ड बाय पुणे येथील ‘भारती संस्कृती दर्शन ट्रस्ट’, ‘लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’, ‘युअर मॉल’, ‘आयुशक्ती’ आणि ‘रिसो १०० टक्के राइसब्रान ऑइल’ आहे.

  • कुठे – कांती विसारिया सभागृह, महर्षी कर्वे रोड, गावदेवी मैदानाजवळ, ठाणे (प.)
  • कधी – शुक्रवार, २३ जून, संध्याकाळी सहा वाजता.