उन्हाळ्याच्या दिवसांत घरोघरी शेवया, पापड, लोणचे बनवण्याचे प्रमाण आता कमी झाले असले तरी आजही अनेक घरांत या कामांसाठी सुटीचा सदुपयोग केला जातो. या पाश्र्वभूमीवर पापड, लोणचे बनवण्यासाठीचे साहित्यही महाग होते. मात्र, यंदा ऐन हंगामात पापडाच्या तयार पिठाचे दर किलोमागे २५ रुपयांनी घटल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. तर उडीद डाळीचे दरही किलोमागे १५ ते २० रुपयांनी घटले आहेत.
डाळींचे उत्पादन कितीही असले तरी पापड एप्रिल महिन्याच्या अखेरीस पापड-पीठ महागच मिळणार हे ठरलेले असते. यंदा मात्र काहीसे उलट चित्र पाहायला मिळत आहे. सफेद उडदाच्या डाळीचे भाव गेल्या पंधवडय़ापासून किलोमागे चक्क १५ ते २० रुपयांनी खाली आल्याने बाजारात उपलब्ध असणारे पापडाचे पीठही स्वस्त मिळू लागले आहे. एप्रिल महिन्यात या तयार पापडाच्या पिठाचे भाव १७५च्या आसपास होते. आता हा भाव १५० रुपयांपर्यंत आला आहे. ‘डाळीचे भाव कमी झाल्याने पिठाचे भावही उतरले आहेत. या महिन्यात जास्त ग्राहक बेगमीसाठी लागणारा बाजारहाट खरेदी करत नाही. यामुळे भाव कमी होतात,’ अशी माहिती दीपक स्टोअर्सचे रॉबीन देढिया यांनी दिली.

एक किलो पापडाच्या पिठासाठी २०० रुपये द्यायचे आणि त्यातही साधारण १०० च्या आसपास पापड तयार होतात, मग त्यापेक्षा विकतचे पापड आणलेले परवडतील असाच विचार आम्ही करत होतो. मात्र आता २५ ते ३० रुपयांचा फरक यात पडला असल्याने जास्तीचे पापड बनविण्यास हरकत नाही.
-प्रमिला पवार, गृहिणी

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

शर्मिला वाळुंज, डोंबिवली