प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं, तिचं ज्या ‘राजकुमाराशी’ लग्न होईल त्याने मोठ्या ऐटीत तिला लग्नाची मागणी घालावी. त्यानं असं काही करावं की सगळेच त्यांच्याकडे पाहात बसतील. मुलांचंही तसंच असतं आपल्या आयुष्यात असलेल्या मुलीला ती किती ‘स्पेशल’ आहे हे दाखवून देण्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतात. पण ‘वाट्टेल’ ते करण्याच्या नादात कधी कधी काही भलतंच होऊन बसतं. आता स्टिफन आणि ख्रिस्टनचंच घ्या ना! स्टिफनला आपली प्रेयसी ख्रिस्टन हिला लग्नाची मागणी घालायची होती. आता ही मागणी त्याने एकदम फिल्मी स्टाईलने घालायची ठरवली. ख्रिस्टनलाही लहानपणापासून हॉट एअर बलूनमध्ये बसण्याची भारीच हौस होती. तेव्हा तिची इच्छाही पूर्ण करायची आणि तिला आकाशात लग्नाची मागणीही घालायची असा विचार स्टिफनच्या मनात आला. मग काय ख्रिस्टनला घेऊन तो हॉट एअर बलूनमधून सफारीला निघाला. आता हा फुगा हवेत उंच उंच गेल्यावर स्टिफनने फिल्मी स्टाईलने अंगठी बाहेर काढली आणि ख्रिस्टन समोर प्रेमाची कबुली दिली.

वाचा : बार्शीमध्ये नवरा-नवरीने चक्क स्मशानभूमीत केलं लग्न!

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
Brazilian woman brings dead man in wheelchair to bank to sign loan
पैशासाठी काहीपण! मृत काकांना व्हिलचेअरवर घेऊन बँकेत पोहचली महिला अन्….धक्कादायक घटनेचा Video Viral
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या

आता एवढं सगळं फिल्मी स्टाईलने चाललं असताना चित्रपटासारखा ट्विस्ट आला नाही तर नवलंच. हवेचा फुगा जमिनीपासून पन्नास एक फूट उंच गेल्यावर फुग्यातील हवाच गेली आणि होत्याचं नव्हतं झालं. आकाशात असेलला हॉट एअर बलून अपघात होऊन झरझर खाली आला, आता काही आपलं खंर नाही हे दोघांनाही कळून चुकलं. हा हॉट एअर बलून वेगात येऊन जमिनीवर आदळला. सुदैवाने या जोडप्याला फार दुखापत झाली नाही. आता एवढ्या मोठ्या अपघातातून वाचल्यावर साहजिक दोघांनी देवाचे आभार वगैरे मानले. आता एवढं सगळं होऊन ख्रिस्टन आपल्याला नाही म्हणेल असं स्टिफनला वाटलं होतं. पण प्रेमाचं हे प्रपोजल फारच रोमांचकारी होतं म्हणत ख्रिस्टनने त्याला होकार देऊनही टाकला.

Viral Video : भक्ष्य समजून सापाने गिळली प्लॅस्टिकची बाटली