सोमवारी २१ ऑगस्ट रोजी असणारे खग्रास सूर्यग्रहण जगातील काही भागांत दिसणार आहे. हे ग्रहण प्रशांत महासागर, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागात, यूरोपच्या पश्चिम आणि उत्तर भागात, पूर्व आशिया आणि वायव्य अफ्रिका या भागांमध्ये दिसणार आहे. या सूर्यग्रहण भारतातील वेळेनुसार रात्री ९.१५ ते २.३४ या वेळात असेल. ११ वाजून ५१ मिनिट हा ग्रहणाचा मध्यकाळ असेल. ग्रहणाच्यावेळी भारतात रात्र असल्याने ग्रहण दिसू शकणार नाही.

जगातील ज्याठिकाणी हे सूर्यग्रहण दिसणार आहे त्याठिकाणी लोक घराबाहेर येत त्याचे दर्शन घेऊ शकणार आहेत. मात्र भारतातील नागरिकांना याचा लाभ घेता येणार नसल्याने लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून हे दर्शन घेता येणार आहे. यासाठी अनेक यंत्रणा काम करणार असून यामध्ये अमेरिकेच्या नासाव्दारेही हे सूर्यग्रहण दाखविले जाणार आहे. नासा एकूण १२ ठिकाणांहून सूर्यग्रहणाचे प्रक्षेपण करणार आहे. अमेरिकन वेळेनुसार दुपारी १२ वाजता हे प्रक्षेपण पाहता येणार आहे.

सूर्यग्रहण नेमके केव्हा होते?

जेव्हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. यामध्ये तीन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात चंद्र पूर्णपणे पृथ्वीला झाकून टाकतो. याला पूर्ण सूर्यग्रहण म्हणतात. या स्थितीत सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचूच शकत नाहीत आणि त्यामुळे पृथ्वीवर पूर्णपणे अंधार पडतो. दुसरे म्हणजे अंशतः सूर्यग्रहण, यामध्ये चंद्र सूर्याच्या काही भागाला झाकून टाकतो. यामुळे जगातील काही ठिकाणी सूर्य दिसू शकत नाही. तिसरे म्हणजे खग्रास सूर्यग्रहण जे अमावस्येच्यादिवशी दिसते. यामध्ये सूर्य अंगठीप्रमाणे दिसतो.