महिलांच्या मनात एखादी गोष्ट भरली की जोपर्यंत ती आपल्याकडे येत नाही तोपर्यंत त्या काही स्वस्थ बसत नाही. त्यातून विषय साडी, ओढणी, टॉप किंवा इतर कपड्यांच्या बाबतीत असला तर मग विचारायलाच नको. आता हेच बघा ना एका महिलेला पंतप्रधान मोदींनी परिधान केलेला स्कार्फ एवढा आवडला की तिने ‘मला हा स्कार्फ हवा’ असल्याचे ट्विट केले आणि काय आश्चर्य दिलदार मोदींनी २१ तासांच्या आत तो स्कार्फ तिच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्थाही केली.

वाचा : भारताला अंतराळात नेणाऱ्या महिला

Viral : ‘या’ जांभळ्या पक्ष्याला फेसबुकवरून हटवा रे!

महाशिवरात्रीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोईम्बतूरमध्ये ११२ फुटांच्या शंकराच्या मूर्तीचे अनावरण केले. यावेळी कुडत्यावर त्यांनी भगवान शंकराची प्रतिमा असलेला निळ्या हिरव्या रंगाचा स्कार्फ परिधान केला होता. यावेळी शिल्पी तिवारी नावाच्या महिलेने ट्विट करत आपल्यालाही असा स्कार्फ हवे असल्याचे लिहिले आणि काय आश्चर्य २१ तासांच्या आत शिल्पीपर्यंत तो स्कार्फ पोहोचलाही. मोदींनी शिल्पीला एक फोटोही पाठवला. तो शिल्पीच्या ट्विटचा होता. त्यावर मोदींनी स्वाक्षरीही केली होती. आता खुद्द प्रतंप्रधानांनी आपल्याला भेट पाठवल्याचा आनंद या महिलेला किती झाला असेल हे वेगळं सांगायला नको. ‘आधुनिक भारताच्या कर्मयोगींचा आशीर्वाद मिळाल्याने मी खुप खूश आहे’ असे ट्विट करत तिने हा फोटो शेअर केला आहे.