सध्याच्या या धकाधकीच्या आणि महागाईच्या दुनियेत प्रत्येकजण हा हिशेबी झालेला आहे. परंतु ह्या हिशेबीपणाच्या नादात अतिहिशेबीपणामुळे त्याचे परिणाम ही तितकेच वाईट येऊ शकतात. यामुळे आयुष्यात कशी वेळ येऊ शकते? कसा गुंता निर्माण होऊ शकतो? ह्या सर्व गोष्टींवर भाष्य करणारा एका वेगळ्या धाटणीचा ‘करार ‘ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपट अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री क्रांती रेडकर आणि उर्मिला कानेटकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.