बिटकॉइन हे कॉम्प्युटरच्या किचकट प्रक्रियेतून तयार करण्यात आलेले डिजिटल किंवा व्हच्र्युअल चलन आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने जगभरात त्याचा वापर वाढत आहे.  रिझव्‍‌र्ह बँकेने  मात्र  याचा वापर करू नये असा सल्ला  नुकताच दिला आहे. ही संकल्पना आणि त्यातील आर्थिक व्यवहारांचा आढावा घेणारे हे लेख..
शेअर बाजाराचे जसे स्टॉक एक्स्चेंज असते किंवा आंतरराष्ट्रीय चलन बाजाराचे करन्सी एक्स्चेंज असते, कमॉडिटी एक्स्चेंज असते, मेटल एक्स्चेंज असते तसेच बिटकॉइन हे ‘करन्सी एक्स्चेंज’ आहे. योग्य ती गुंतवणूक करून व नियमांशी बांधीलकी पाळण्याचे वचन देऊन कोणालाही या एक्स्चेंजचे सभासद होता येते. बिटकॉइनचा प्रोटोकॉल हा खुल्या आधारावर  बेतलेला आहे. बिटकॉइनवर केलेल्या देवाणघेवाणीचा लॉग हा या यंत्रणेचा कणा आहे. बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सी आहे. ती पब्लिक-की क्रिप्टोग्राफी वापरते. क्रिप्टोग्राफी म्हणजे, माहितीच्या आदानप्रदानाचे सुरक्षित तंत्र आणि संशोधन आहे. ही सुरक्षितता देवाणघेवाण करणाऱ्या दोघांपुरतीच मर्यादित असते. या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या कोणापासून म्हणजे अ‍ॅडव्हरसरीज (अ५िी१२ं१्री२) पासून गुप्त ठेवली जाते. साधारण या अ‍ॅडव्हरसरीज पसे, सेवा, उत्पादने यांच्या वायदे-व्यवहारावर लक्ष ठेवून त्याचा फायदा सट्टा खेळण्यासाठी उचलत असतात, हे देवाणघेवाण करणाऱ्याच्या हिताचे नसते. बिटकॉइनच्या अल्पावधीतील यशाचे गमक हे अशा अ‍ॅडव्हरसरीजच्या प्रोटोकॉलपासून आणि उपद्रवापासून पूर्णपणे वेगळे राहण्याची सोय हे आहे. या अलिप्त व्यवस्थेत डेटा सर्वार्थाने सुरक्षित राहतो. गणित, लॉजिक, गणकयंत्र-शास्त्र आणि विद्युत अभियांत्रिकी या चार शास्त्रांवर उभ्या असलेल्या या व्यवस्थेचे क्रिप्टोग्राफी हे कवच असते. या तंत्राचा उपयोग एटीएम कार्ड्स, गणकयंत्र-पासवर्ड आणि ई-व्यापार अशा गोष्टींमध्ये आज सर्रास होत असतो.
बिटकॉइनद्वारे ग्राहक आणि विक्रेता यांच्या बिटकॉइन चलनाचा विनिमय कोणत्याही (देशाच्या) चलनाद्वारे होत नाही. त्यावर कोणत्याही केंद्रीय बँक व्यवस्थेचा अंकुश नसतो, तर उलटपक्षी ग्राहकच आपल्या व्यवहाराचा पब्लिक ट्रॅन्झ्ॉक्शन लॉग आणि ब्लॉगचेन अपडेट करून मागतो. या सगळ्या देवाणघेवाणीचा हिशेब पाहून ‘डी-सेन्ट्रलाइज्ड’ नेटवर्कद्वारे, कोणाजवळ किती बिटकॉइन्स आहेत, याचा धांडोळा घेता येतो. या नेटवर्कमध्ये कार्यरत असणाऱ्या नेटिझन्स, यांना ‘मायनर्स’ म्हणजे खाण कामगार, असे संबोधले जाते. त्यांनी नोंदवलेल्या देवाणघेवाणीच्या सौद्यांवर त्यांना फी म्हणून बिदागीही दिली जाते. या सगळ्या व्यवहारात बेकायदेशीर आणि अनतिक अशा गोष्टींचा व्यापार होणे हे टाळता येत नाही. असे धंदे करणारी ‘सिल्क रोड’ ही ऑनलाइन कंपनी एफबीआयने कायमची बंद केली आणि त्यांच्याकडून २८.५ अब्ज डॉलर किमतीचे बिटकॉइन्स जप्त केले. पण असे गरप्रकार हे कुठल्याही प्रकारच्या बँकिंग व्यवस्थेत होऊ शकतात.
आश्चर्य म्हणजे अमेरिकेने बिटकॉइन व्यवस्थेला मत्रीचा हात पुढे केला आहे, तर चीन, युरोपीयन देश आणि भारत यांनी बिटकॉइनविरुद्ध धोक्याची घंटा वाजवली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हचे अध्यक्ष बेन बर्नान्के  यांनी अशा प्रकारच्या व्हच्र्युअल चलनाला भविष्यात चांगले दिवस येतील, असे म्हटले आहे, तर जर्मनीने बिटकॉइनला ‘युनिट ऑफ अकाऊंट’ असा आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवस्थेत प्रस्थापित दर्जा दिला आहे. इतिहासात डॉलरसमोर दमछाक होणाऱ्या डॉइश मार्कला मूठमाती देऊन ‘युरो’ या युरोपीयन चलनाचे उद्गाते असलेल्या जर्मनीला, चलनाचा पुरवठा मर्यादित ठेवणाऱ्या बिटकॉइनचा आधार वाटणे साहजिकच आहे. आज अगदी छोटय़ा प्रमाणात दुकाने, सुपर मार्केट्स, हॉटेल, रेस्टॉरंट अशी व्यापारी आस्थापने पाश्चात्त्य देशांत बिटकॉइन स्वीकारू लागली आहेत. परंतु स्विस बँकांच्या धर्तीवर बिटकॉइनमध्ये देवाणघेवाण करण्याविषयी जी गुप्तता राखली जाते, त्याचा फायदा अमली पदार्थ, शस्त्रास्त्र आदींचे दलाल, भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट लष्करशहा, नोकरशहा यांनी उठवला नाही तरच नवल! चीनमधील अशा नाठाळ गुंतवणूकदारांनी बिटकॉइनचा असा ‘अव्यापारेषु व्यापार’ करून जीबीएल या चिनी बिटकॉइन एक्स्चेंजमधील ४० लाख डॉलरच्या ठेवी लंपास केल्या. तसेच जवळजवळ १० लाख बिटकॉइनचा गफला बीआयपीएस या युरोपीयन एक्स्चेंजमध्ये झाल्याचे उघडकीला आले आहे.
आजमितीस बिटकॉइनच्या नेटवर्कधारकांची संख्या १,७२,००० एवढी भरते. बिटकॉइन कमावण्याच्या त्यांच्यात असणाऱ्या स्पध्रेमुळे त्यांची संख्या वाढतच जाणार आहे. आजमितीला २१ मिलियन बिटकॉइन हे व्हच्र्युअल चलनात अवतरले आहेत. ही ग्राहक (मायनर्स) संख्या आणि बिटकॉइन्सचा आकार जसा वाढत जाईल तशी कॉम्प्युटर पॉवरही वाढवत न्यावी लागेल. ज्या देशांमध्ये चलनविषयक अनिश्चितता जास्त असेल तिथे बिटकॉइनचा आधार अधिक घेतला जाईल. स्पेन, इराण आणि अर्जेटिनामध्ये हे प्रकर्षांने जाणवले आहे. याचे कारण म्हणजे बिटकॉइनला चलनवाढ किंवा केंद्रीय बँकेची जाचदायक बंधने भेडसावत नाहीत. कोणत्याही सार्वभौम (सॉव्हरीन) चलनापेक्षा व्यवहारात बिटकॉइन अधिक सार्वभौम वाटते-भासते ते यामुळेच. त्याचप्रमाणे बिटकॉइनमध्ये जसा दफ कोडचा वापर वाढत जाईल, तशी त्याची गती आणि अचूकताही वेगाने वाढत जाईल. बिटकॉइनचे नियम व अटी खूपच शिथिल आणि लवचीक आहेत. ही यंत्रणा नियमांबाबत नाजूक असली तरी विश्वासार्हतेत मात्र कठोर आहे. बिटकॉइनचे नवे एक्स्चेंज उभारण्यासाठी हल्लीच ३.२५ मिलियन डॉलरच्या भांडवलाची उभारणी प्रवर्तकांनी केली.
कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वाचे मर्मस्थान म्हणजे त्या देशाच्या केंद्रीय बँकेचा नोटा छापण्याचा छापखाना ही होय. जेव्हा लागेल तसा चलनपुरवठा कमी-अधिक करून देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा शासनाला या छापखान्याच्या एकाधिकारशाहीमुळे चालवणे सुकर जाते. बिटकॉइनसारखे व्हच्र्युअल चलन अस्तित्वात आले, तर तो देशोदेशीच्या सरकारांचे हे चलनी-आíथक बळ कमी करणारे ठरेल. या भीतीमुळेच भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने बिटकॉइनसारख्या चलनव्यवस्थेला विरोध दर्शविला आहे. ग्परंतु इंटरनेटवरील ई-कॉमर्सविषयीचे भारताचे धोरण आता निश्चित झाले आहे. त्यात बदल करून बिटकॉइनसारख्या डिजिटल चलनांसमोर अडथळे उभे करणे आता कठीण आहे. ‘आपल्या परवानगीशिवाय बिटकॉइनला व्यवसाय करता येणार नाही’ अशी जुनाट पठडीतील धारणा तिसऱ्या जगातील केंद्रीय बँकांनी बाळगणे हे थोडे धाडसाचे ठरेल. आजच्या घडीला जवळजवळ बिटकॉइनचे ३५ हजार सभासद डाऊनलोड्स भारतात नोंदले गेलेले आहेत आणि प्रत्येक डाऊनलोड्सशी दोन ते तीन ग्राहक निगडित आहेत. आरबीआयने धमक्या दिल्या आणि जबाबदारी झटकली, तरी आत्तापर्यंतच्या पसा आणि बँकिंगच्या जागतिक इतिहासात क्रांतिकारक ठरणाऱ्या बिटकॉइनसारख्या व्हच्र्युअल करन्सीजचे महत्त्व भविष्यात विजेच्या वेगाने वाढणार आहे आणि म्हणून जगातील सार्वभौम राजकीय सत्तांना पुन्हा नव्याने ‘आम्हास आम्ही पुन्हा पाहावे काढून चष्मा डोळ्यांवरचा’ अशी भूमिका घ्यावी लागेल. गुगलसारखी व्यवसाय-सार्वभौम, औद्योगिक आय.टी. ताकद बिटकॉइनमध्ये मोठी गुंतवणूक करून राहिली आहे. व्हर्जनिवाले रिचर्ड ब्रॉन्सन, पे-पालचे अध्यक्ष डेव्हिड मार्कुस, पीटर थाईल असे हे अब्जाधीश गुंतवणूकदार बिटकॉइनमध्ये ‘इन्व्हेस्टर’ आहेत. यातच बिटकॉइनची ताकद स्पष्ट दिसते. बिटाकॉइन एकटी नाही, तर भविष्यात जगातील दुष्ट-शक्तींचा-प्रथांचा निचरा करण्याच्या इच्छेने झपाटलेले लाखो नेटिझन्स त्यांच्या या स्वप्नवत वाटणाऱ्या पण प्रत्यक्षात उतरलेल्या, नव्या बिनसरकारी आणि जागतिक चलन-सार्वभौम आíथक व्यवस्थेचे स्वागत, वापर आणि संरक्षण करण्यासाठी सज्ज आहेत.