डॉ. देवदत्त गोरे यांनी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी एचआयव्हीबाधितांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीच्या टिळक आळीमध्ये डॉ. गोरे वैद्यकीय व्यवसाय करत असत. त्यांच्याकडे या आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण यायचे. त्यांच्यासाठी औषधोपचार खर्चीक होते. अनेकांची तशी आर्थिक परिस्थिती नसायची. या आजाराला असलेले हे आर्थिक-सामाजिक पदर लक्षात घेऊन डॉक्टरांनी २००३ मध्ये गुरुप्रसाद ट्रस्ट या नावाने स्वयंसेवी संस्था स्थापन केली..

नि रोगी, निरामय आयुष्य लाभावं अशी साऱ्यांचीच इच्छा असते, पण प्रत्यक्षात फार थोडय़ा लोकांना तसं भाग्य लाभतं. बाकी बहुसंख्य लोक आयुष्यात केव्हा ना केव्हा छोटय़ा-मोठय़ा आजारांचा सामना करत असतात. बदलत्या जीवनशैलीमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारखे एके काळी आयुष्याच्या उत्तरार्धात जडणारे आजार तरुणपणापासूनच पिच्छा पुरवू लागलेले दिसतात. पण वैद्यक शास्त्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि संशोधनामुळे त्यासह आनंदाने जीवन जगणं बऱ्याच प्रमाणात शक्य झालं आहे. त्या तुलनेत कर्करोगासारख्या आजाराचं आजही संबंधित रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांवर मोठं दडपण आलेलं आपण बघतो. मात्र या सगळ्या ‘प्रतिष्ठित’ आजारांपेक्षा वेगळा आणि संबंधित व्यक्ती व कुटुंबाचं जीवन हादरवून सोडणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव सुमारे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी भारतात झाला. त्याचं नाव आहे, अ‍ॅक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिण्ड्रोम अर्थात एड्स! अशा रोगग्रस्त व्यक्तीमध्ये प्रतिकारशक्तीचा अभाव (ह्य़ुमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस-एचआयव्ही) वेगाने वाढू लागतो. ही लागण झालेला रुग्ण  एचआयव्हीबाधित म्हणून ओळखला जातो. अशा व्यक्तीचं रक्त एखाद्या निरोगी व्यक्तीच्या रक्तामध्ये कोणत्याही कारणाने मिसळलं गेलं तरी त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. उदाहरणार्थ, या व्यक्तीवर शस्त्रक्रिया करताना तिचं रक्त तिथे असलेल्या परिचारक किंवा डॉक्टरच्या उघडय़ा जखमेमध्ये मिसळलं तरी त्याचा संसर्ग होऊ शकतो किंवा अन्य कुठल्या तरी गंभीर आजारामुळे एखाद्या रुग्णाला दिलं गेलेलं रक्त एचआयव्हीबाधित व्यक्तीचं असलं तरी तो रुग्ण या रोगाची शिकार होऊ शकतो. एड्सग्रस्त पतीकडून निरोगी पत्नीकडे या रोगाचं संक्रमण होण्याची शक्यता अनेकदा असते. त्यातून जन्माला येणारं बाळ, त्याचा कोणताही दोष नसताना जन्मत:च एचआयव्हीग्रस्त होतं. पण या मुद्दय़ांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि असुरक्षित शारीरिक संबंधांमुळे हा रोग पसरतो, हेच जास्त प्रभावीपणे सर्वत्र ठसवलं गेल्यामुळे अशी व्यक्ती अस्पृश्य, सामाजिकदृष्टय़ा बहिष्कृत ठरते. शिवाय हा रुग्ण पूर्णपणे बरा होणं अशक्य असतं, किंबहुना दरदिवशी तो मृत्यूच्या जवळ जात असतो, हाही सार्वत्रिक समज असल्यामुळे अशा व्यक्तीच्या कुटुंबीयांसह सर्वानाच त्याच्यासाठी काही करणं म्हणजे आधीच हारलेली लढाई लढत राहण्यासारखं वाटत असतं. त्याहीमुळे या रुग्णाला एकाकी जिणं नशिबी येतं. या शतकाच्या सुरुवातीला जगात सुमारे साडेतीन कोटी लोक एचआयव्हीने बाधित होते आणि त्यापैकी ९० टक्के विकसनशील देशांतले होते, असं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. मोठय़ा प्रमाणात जनजागृती आणि आधुनिक उपचार पद्धतीमुळे आता या आजाराचा प्रसार पूर्वीइतक्या वेगाने होत नसला तरी आपल्या देशात त्याचं प्रमाण स्थिर राहिलेलं आहे. विशेषत: काम-धंद्यानिमित्त परगावी एकटे राहणाऱ्या व्यक्ती अजूनही या विकाराच्या बळी ठरत आहेत.

rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

एचआयव्हीबाधितांना हक्काचा निवारा हवा

या सर्व परिस्थितीची डॉक्टर म्हणून पूर्ण कल्पना असतानाही रत्नागिरीतले कै. डॉ. देवदत्त गोरे यांनी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी एचआयव्हीबाधितांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीच्या टिळक आळीमध्ये डॉ. गोरे वैद्यकीय व्यवसाय करत असत. स्वाभाविकपणे विविध प्रकारच्या रुग्णांशी त्यांचा सतत संबंध येत असे. त्यापैकी काही या आजाराने ग्रस्त होते. मात्र त्यावरील औषधोपचार काहीसे खर्चीक होते. शिवाय रोगाची लागण झाल्यापासून अखेपर्यंत ही औषधं घेणं गरजेचं असतं. अनेकांची तशी आर्थिक परिस्थिती नसायची. या आजाराला असलेले हे आर्थिक-सामाजिक पदर लक्षात घेऊन डॉक्टरांनी या संदर्भात केवळ व्यक्तिगत पातळीवर व्यावसायिक उपचार करण्यापुरतं स्वत:ला मर्यादित न ठेवता २००३ मध्ये गुरुप्रसाद ट्रस्ट या नावाने स्वयंसेवी संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्य़ात एचआयव्हीबाधितांसाठी काम सुरू केलं. दुर्दैवाने त्यानंतर आठ वर्षांनी, २०१० मध्ये डॉ. गोरेंचं निधन झालं. पण मिलिंद राजवाडे, राजेश आंबर्डेकर, प्रेरणा गोवेकर, मीरा चव्हाण, मनोज गमरे इत्यादी त्यांचे जणू उत्तराधिकारी असलेली मंडळी हे अवघड कार्य नेटाने पुढे चालवत आहेत. या सर्वानी डॉक्टरांबरोबर काम केलं असल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन आणि कामाची पद्धत या कार्यकर्त्यांमध्येही चांगली उतरली आहे.

सध्या संस्थेकडे रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या २ हजार ३६५ एचआयव्हीबाधित व्यक्तींची नोंदणी झाली असून त्यामध्ये सुमारे पन्नास टक्के महिला आहेत आणि त्यांच्यापैकी बहुसंख्य विधवा आहेत. ही परिस्थिती अतिशय भयानक आहे. स्वत:चा कोणताही अपराध नसताना केवळ नवऱ्याकडून हा आजार संक्रमित झालेल्या ग्रामीण भागातल्या स्त्रियांच्या नशिबी अनेकदा परित्यक्तेचं जिणं येतं. अशा महिलांना उपचारांबरोबरच मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आधार देण्याचं अतिशय अवघड काम हे कार्यकर्ते करत आहेत. दुर्दैवाने या कार्यकर्त्यांपैकी काही जण स्वत:ही एचआयव्हीबाधित आहेत. पण म्हणूनच ते या रुग्णांच्या आजाराचीअवस्था, मानसिक ताण-तणाव आणि वेदना जास्त चांगल्या प्रकारे जाणू शकतात आणि ते कमी करण्यासाठी जास्त परिणामकारक पद्धतीने काम करू शकतात. ट्रस्टतर्फे सध्या रत्नागिरी जिल्ह्य़ात ‘विहान’ हा एचआयव्हीग्रस्तांची काळजी घेण्यासाठी आणि आधार देण्यासाठी विशेष प्रकल्प राबवण्यात येत आहे. डिसेंबर २०१३ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पांतर्गत प्रकल्प संचालक, समन्वयक , महिला व पुरुष समुपदेशक, जिल्ह्य़ात काम करणारे पाच क्षेत्रीय कार्यकर्ते आणि एक साहाय्यक असा चमू काम करत आहे. संस्थेकडे नोंदणीकृत रुग्णांची दर महिन्याला तालुकावार बैठका घेणं, शासकीय योजनांची माहिती देणं, पोषकमूल्यं असलेला आहार पुरवणं इत्यादी कामं हे कार्यकर्ते नियमितपणे करतात. आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ असलेल्या रुग्णांना केवळ मोफत औषधोपचार नव्हे, तर प्रसंगी प्रवासखर्च, पोषण आहारासाठी आर्थिक मदत, त्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत आणि तसाच प्रसंग गुदरला तर रुग्णवाहिका आणि अंत्यसंस्काराचाही खर्च ट्रस्टतर्फे केला जातो.  मात्र त्यासाठी एका संस्थेकडून मिळालेला निधी विशिष्ट काळापुरता असल्यामुळे हे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे.

एचआयव्हीग्रस्त प्रौढ स्त्री-पुरुषांपेक्षाही या आजाराचे अकारण बळी ठरलेल्या बालकांचं पुनर्वसन हे या संस्थेपुढे असलेलं सर्वात आव्हानात्मक काम आहे. या आजाराची लागण झालेल्या पुरुषामुळे अशी मुले जन्माला येण्याचा धोका सर्वात जास्त संभवतो. पण काहीही गुन्हा नसताना ही कमनशिबी बालकं नियतीच्या निर्दय खेळीचा बळी ठरलेली असतात. सध्या अशा १६५ मुलांची ‘गुरुप्रसाद’तर्फे घेतली जात आहे. त्यापैकी काही मुलांचं पंढरपूर किंवा गोव्यात काम करत असलेल्या संस्थांच्या मदतीने पुनर्वसन केलं जातं. पण भविष्यात त्यांच्यासाठी संस्थेचं स्वतंत्र वसतिगृह बांधण्याची योजना आहे. रत्नागिरीपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या करबुडे या ठिकाणी त्यासाठी आवश्यक जमीन संस्थेला देणगीदाखल मिळाली आहे. तिथे हे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी एकूण सुमारे एक कोटी रुपये निधीची गरज आहे. याचबरोबर सध्या संस्थेचे कर्मचारी, स्वयंसेवकांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. पण तो कराराने विशिष्ट कालावधीपुरता आहे. त्यापुढे जाऊन संस्थेला आर्थिक आघाडीवर स्थर्य येण्यासाठी कायमस्वरूपी निधीचीही गरज आहे.

‘गुरुप्रसाद’चे  कार्यकर्ते एक दशकापेक्षा जास्त काळ अबोलपणे करत आले आहेत. या वाटचालीत काही वेळा शंका-कुशंका, संशय आणि क्वचितप्रसंगी अवहेलनाही त्यांच्या वाटय़ाला आली. पण ‘वैष्णव जन तो तेणे रे कहिये जो..’ या भावनेने कमालीची संवेदना आणि समवेदनाही बाळगून ते पुढे चालत राहिले आहेत. आता त्यांचं लक्ष्य आहे या न मागितलेल्या दुखण्याची शिकार झालेल्या भावी पिढीचं जीवन उजळवण्याचं आणि त्यासाठी त्यांना साथ हवी आहे उदारमनस्क हितचिंतकांची!

संस्थेपर्यंत कसे जाल?

रत्नागिरी शहराच्या मध्यवस्तीमध्ये टिळक आळी असून तेथे लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आहे. या ठिकाणाच्या सुमारे शंभर मीटर अलीकडे डाव्या हाताला गुरुप्रसाद संस्थेची जुन्या पद्धतीची कौलारू इमारत आहे.

धनादेश या नावाने पाठवा..

गुरुप्रसाद  ( Guruprasad ) (कलम ८०जी (५) नुसार देणग्या करसवलतीस पात्र आहेत)

 

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

  • मुंबई कार्यालय : लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०५३६
  • महापे कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
  • ठाणे कार्यालय : संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३८५१३२
  • पुणे कार्यालय : संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४११२५
  • नाशिक कार्यालय : संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
  • नागपूर कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३
  • औरंगाबाद कार्यालय : संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३
  • नगर कार्यालय : संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
  • दिल्ली कार्यालय : संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००

मातेची मूक श्रद्धांजली

फार मोठय़ा देणगीदार संस्थांचं पाठबळ ‘गुरुप्रसाद’ला नाही, पण या कामाचं मोल जाणणारे अनेक जण व्यक्तिगत पातळीवर संस्थेला नियमितपणे अर्थसाहाय्य करून या कार्यासाठी हातभार लावत असतात. त्यामध्ये अशा एका मातेचाही समावेश आहे, ज्यांना आपला मुलगा या आजारामुळे गमवावा लागला. दरवर्षी गणेशोत्सवात त्या संस्थेला  देणगी देऊन आपल्या दिवंगत मुलाला मूक श्रद्धांजली अर्पण करतात.

गुरुप्रसाद ट्रस्ट रत्नागिरी

जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात प्रत्यक्ष काम करताना ‘गुरुप्रसाद’चे कार्यकत्रे एचआयव्हीबाधित व्यक्तीच्या कौटुंबिक पुनर्वसनासाठी प्रथम प्रयत्न करतात. कारण अशा व्यक्तीवर वैद्यकीय उपचार करत असतानाच त्यांचं सामाजिक पुनर्वसन यशस्वीपणे करणंही गरजेचं असतं.

  • जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात असलेले एचआयव्हीग्रस्त शोधणं, त्यांचं समुपदेशन, मासिक बैठका व पुढील उपचारांसाठी प्रयत्न करण्याचं काम ट्रस्टचे कार्यकर्ते करत असतात.
  • या कामात रत्नागिरीच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातील अ‍ॅण्टीरेट्रोव्हायरल सेंटरचीही उत्तम साथ त्यांना मिळते.

 

– सतीश कामत