सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी २० डिसेंबर रोजी होणार आहे. अस्तित्व संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या लोकसत्ता लोकांकिकेसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक म्हणून ‘झी मराठी’ ची साथ मिळाली आहे. आयरिस प्रॉडक्शन टॅलेंट पार्टनर असून केसरी ट्रॅव्हल्स, बँक ऑफ महाराष्ट्र व इंडियन ऑइल यांचाही स्पर्धेच्या आयोजनात मोठा वाटा आहे. या स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेऱ्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद आणि रत्नागिरी येथे झाल्या. त्यांची क्षणचित्रे..

‘चिठ्ठी’चा आव्वाज घुमणार.
ek11‘आले रे.. आले’.., ‘येऊन येऊन येणार कोण’.. अशा घोषणा.. त्याचवेळी सेट.. रेडी, लाईट्स.. रेडी, साऊंड.. रेडी.. अशी लगबग.. पाठोपाठ सादर होणारी अभिनयाची अॅक्शन.. त्यावर मिळणाऱ्या टाळ्या.. अशा उत्साहाच्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत आयएलएस विधी महाविद्यालयाचा ‘आव्वाज’ घुमला. पुणे विभागाच्या अंतिम फेरीसाठी नागराज मंजुळे, प्रसाद वनारसे, गौरी लागू यांनी परीक्षण केले. प्राथमिक फेरीचे आव्हान पार करून आलेल्या सवरेत्कृष्ट पाच एकांकिका विभागीय अंतिम फेरीत सादर झाल्या. या फेरीत आयएलएस विधी महाविद्यालयाची ‘चिठ्ठी’ या एकांकिकेने बाजी मारली. दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत अशा सर्व वैयक्तिक पारितोषिकांसह सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही आयएलएसने पटकावले. सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘फोटू’ला मिळाले, तर तृतीय पारितोषिक गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘रूह हमारी’ या एकांकिकेला मिळाले.

ugc new decision direct admission to phd after graduation
आता पदवीनंतर पीएच.डी.ला मिळणार थेट प्रवेश! काय आहे युजीसीचा नवा निर्णय? युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांची माहिती 
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा

वैयक्तिक पारितोषिक विजेते :
सवरेत्कृष्ट दिग्दर्शन
अपूर्वा भिलारे, आयएलएस विधी महा. (चिठ्ठी)
सवरेत्कृष्ट अभिनय
अर्पिता घोगरदरे, ज्ञानरत्न अहिवळे, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
संगीत दिग्दर्शन
 विनित प्रभुणे, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
सवरेत्कृष्ट नेपथ्य
आदेश सारभुकण, रेणुका जोशी, आयएलएस विधी महाविद्यालय
प्रकाश योजना
आनंद थोटांगे, शीतल मेनन, नृपाल डिंगणकर, आयएलएस विधी महा. (चिठ्ठी)

‘बोल मंटो’ची कथा
ek09सआदत हसन मंटो हा ज्या काळातला लेखक होता, त्या काळात बेधडक आणि तेसुद्धा महिलांच्या बाबतीतले बेधडक लिखाण म्हणजे प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रकार! मंटो प्रवाहाच्या विरोधात पोहला आणि त्याला अश्लील, व्याभिचारी लेखक अशी दूषणे दिली गेली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतून त्याला न्यायालयाच्या कठडय़ात उभे राहावे लागले. भारत आणि पाकिस्तानातील या लेखकाच्या कथांवर अनेक नाटय़ाविष्कार सादर झाले, पण लेखन प्रक्रियेवर नाटय़ाविष्कार सादर करण्यासाठी आजपर्यंत कुणी धजावले नाही. मंटोच्या कथांच्या या लेखन प्रक्रियेवर, त्याच्या चारित्र्यावर सादर झालेला नाटय़ाविष्कार म्हणजे ‘बोल मंटो’! आजच्या काळात महिलांच्या बाबतीत जे बोलले जाते, त्यावरची उत्तरे मंटोने त्या काळातच दिलेली होती. मंटोची ही कथा नागपुरातील एलएडी महाविद्यालयातील मुलींनी उत्कृष्टपणे सादर केली. मंटोच्या लेखन प्रक्रियेत येणारे अडथळे, कथा पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर झडणाऱ्या आरोपांच्या फैरी हे मंटोशी साधम्र्य साधणाऱ्या हयात या लेखिकेच्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांसमोर उत्कृष्टपणे सादर केले गेले.

सवरेत्कृष्ट नाटक प्रथम- ‘बोल मंटो’
सवरेत्कृष्ट नाटक द्वितीय- ‘त्या वळणावर’
सवरेत्कृष्ट नाटक तृतीय- ‘मिडिया’
सवरेत्कृष्ट अभिनय- काजल काटे (बोल मंटो)
सवरेत्कृष्ट अभिनय- मानसी जोशी (त्या वळणावर)
सवरेत्कृष्ट दिग्दर्शन- अपूर्वा कुळकर्णी (बोल मंटो)
सवरेत्कृष्ट लेखन- सांची जीवने (बोल मंटो)
सवरेत्कृष्ट प्रकाशयोजना- चेतना वाडवे, पुष्पा पांडे (बोल मंटो)
सवरेत्कृष्ट नेपथ्य- मिथिलेश जोशी (त्या वळणावर)
सवरेत्कृष्ट संगीत- दिव्यानी अनमोलकर (बोल मंटो)

फ्रॉईड तत्त्वज्ञान मांडणारी ‘कबूल है’
ek08‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पध्रेच्या अंतिम फेरीत रत्नागिरी विभागातून डीबीजे महाविद्यालयाच्या ‘कबूल है’ या एकांकिकेने धडक मारली आहे. त्याचबरोबर या केंद्राच्या विभागीय अंतिम फेरीत बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची ‘राजा’ आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘हिय्या’ या एकांकिकांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. एका तरुणाचा विवाह होतो, घरी सत्यनारायणाची पूजा होते. जोडपे मधुचंद्राला निघते. दरम्यान फ्रॉईड आपल्याशी संवाद साधत असतो. आणि अचानक पत्नी आपल्या पतीला ‘तुमच्यात मला माझे वडील दिसतात’, असे सांगते. कधीही न पाहिलेले वडील, नवऱ्याची घालमेल, पत्नीची मानसिक वेदना अशा विविध प्रतलांवरून हे नाटय़ रंगत जाते.

सवरेत्कृष्ट अभिनय
तुषार आठवले (राजा) गौरी फणसे (कबूल है)
दिग्दर्शक
मयुर साळवी (राजा)
नेपथ्य
रोशन ठिक (हिय्या)
लेखक
ओंकार भोजने
(कबूल है)
प्रकाश योजना
स्वानंद देसाई, मधुरा अवसरे (हिय्या)  

मसणातील सोनं
ek07लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ‘स्मशानातील सोनं’ यचा कथेवर बेतलेलं – ‘मसणातील सोनं’ हे नाटक. अहमदनगर विभागातून अंतिम फेरीत दाखल झालेलं. गावात रोजगार हमी योजनेवर काम करणारा मध्यमवयीन गृहस्थ आणि त्याच्या कुटुंबावर ही योजना अचानक बंद पडल्याने उपासमारीचीच वेळ येते. जगण्यासाठी करायचं तरी काय या चिंतेने त्रस्त असलेला नायक स्मशानात जातो. माणसं गेलेल्या व्यक्तीच्या तोंडात सोनं ठेवतात, हे तो पहातो आणि ते सोनं काढून घेऊन कुटुंबाचे पालन पोषण करायचं ठरवतो. एकदा सोनं काढायला गेलेला नायक आणि त्याचवेळी भुकेने व्याकुळ झालेली जंगली श्वापद समोरासमोर येतात आणि भुकेसाठीचा वेगळाच संघर्ष पुढे येतो.

’सवरेत्कृष्ट दिग्दर्शक :
रावबा गजमल (मसणातलं सोनं)
’अभिनय : सिद्धेश्वर
थोरात (जाहला सोहळा अनुपम)
’लेखन : अनिलकुमार साळवे (तिच्यासाठी वाट्टेल ते)
’संगीत : भरत जाधव (मसणातलं सोनं)
’नेपथ्य : रवी बारवाल (जाहला सोहळा अनुपम), मंगेश तुसे व यशपाल गुमलाडू (तिच्यासाठी वाट्टेल ते)
’प्रकाशयोजना : मंगेश भिसे (मसणातलं सोनं)

मॅड वॉक : गौतमं बुद्धाचे तत्वज्ञान
ek06सहजसोपे पण आशयपूर्ण संवाद आणि कसदार अभिनयातून गौतम बुद्धाचे तत्वज्ञान उलगडून दाखवणारी उल्हासनगर येथील सी. एच. एम. महाविद्यालयाच्या ‘मड वॉक’ या एकांकिकेने ठाणे विभागातून अव्वल क्रमांक पटकावत ‘जुनं होण्यात मजा नाही..तर प्राचीन होण्यात मजा आहे’  ‘माहित असलेल्या सत्यावर स्वतची सही मारत फिरणे ही माणसाची जुनी खोड आहे’ अशा प्रकारची विनोदी पण आशयगर्भ टिपणी करणारी ही एकांकिका मनाचा ठाव घेणारी ठरली. जगात बुद्धांच्या सर्वाधिक मुर्ती का आहेत या प्रश्नावर ‘बुद्धाशिवाय एवढे टाकीचे घाव कोणाला सोसले असते ? ’ या एकांकिकेतील प्रतिप्रश्नाने काही क्षण सर्वानाच निरुत्तर केले.

सवरेत्कृष्ट नेपथ्य – सचिन रावकर (मोजलेम)
सवरेत्कृष्ट संगीत – राहुल मोरे (मड वॉक)
सवरेत्कृष्ट अभिनय – अभिजित पवार (मड वॉक)
सवरेत्कृष्ट अभिनय – पवन ठाकूर (मोजलेम)
सवरेत्कृष्ट लेखक – श्रीपाद देशपांडे (मड वॉक)
सवरेत्कृष्ट दिग्दर्शक – अमोल भोर (मोजलेम)

‘हे राम’..
ek05गेल्या काही वर्षांत सण-उत्सवांना जे व्यावसायिक रूप येत गेलं त्यावर मार्मिक भाष्य करणारं हे नाटक, नाशिक विभागातून अंतिम फेरीत पोहोचले. रामनवमीनिमित्त गावात उत्सव साजरा केला जात असतो आणि त्यात रामायणाचे सादरीकरण होत असते. दरवर्षी त्यातील रामाची भूमिका गावकुसाबाहेरील एका कुटुंबात राहणारा तरूण करत असतो. मात्र अचानक एके वर्षी राम मंदीर मंडळ ही प्रक्रिया बदलण्याचा निर्णय घेतं. रामाची भूमिका कोणी करायची याचा जाहीर लीलाव मांडला जातो आणि १० हजार रुपयांची बोली लावून एक राजकीय पुढारी ती भूमिका मिळवतो. वर्षांनुवर्ष रामाची भूमिका करणाऱ्या युवकाला मात्र हे पचविणे अवघड जाते. त्यातच त्याच्या वाटय़ाला दैत्याची भूमिका येते आणि प्रत्यक्ष रामायण प्रसंगात आपल्या मूळ रामाच्या भूमिकेतून बाहेर पडणेच त्या कलाकाराला अशक्य होते, असे नाटय़ या एकांकिकेत मांडण्यात आले होते. उत्तम अभिनय, चालू परिस्थितीवरील मार्मिक भाष्य यामुळे नाटक मनाला भिडणारे ठरले.

सर्वोत्कृष्ठ अभिनय
कलाकार उर्वराज गायकवाड (हे राम) व श्रध्दा कराळे (पाठवण),
सवरेत्कृष्ठ दिग्दर्शन
विनोद राठोड (हे राम),
सवरेत्कृष्ठ नेपथ्य
आलोक राजपूत (तहान),
संगीत दिग्दर्शन
मकरंद हिंगणे (हे राम),
प्रकाशयोजना
रवी रहाणे (तहान)

संवेदनशील विषयावर प्रभावी मांडणी
ek04देहविक्रीच्या बाजारातील संवेदनशील चित्रण कोंडवाडा या एकांकिकेत करण्यात आले आहे. या अनैतिक व्यवसायासाठी होणारी बळजबरी, त्यासाठी मुलींची पळवापळवी आणि वेश्यांचे जीवनावर हे नाटय़ बेतले आहे.
लोकसत्ता-लोकांकिका स्पर्धेच्या नगर केंद्रातून पेमराज सारडा महाविद्यालयाची ही एकांकिका महाअंतिम फेरीत दाखल झाली आहे. वेश्या व्यवसायाठीच पळवून आणलेल्या मुलीची या वस्तीत होणारी घुसमट आणि  या वस्तीतील जीवन, त्यातील व्यवहार दाखवण्याचा प्रयत्न लेखकाने  केला आहे. पळवून आणलेल्या मुलीची या कोंडवाडय़ात आल्यावरही या कामाला तयारी नसते. कुंटणखान्याची मालकीण अक्का त्यासाठी या मुलीवर हरतऱ्हेने बळजबरी करीत असते. त्याला यश तर येत नाहीच, मात्र पुढे ही मुलगी दुसरी, तिसरी कोणी नसून या अक्काचीच मुलगी निघते, हा या सगळ्या नाटय़ाचा क्लायमॅक्स! आपली मुलगी आहे, हे समजल्यावर ही अक्काच तिच्यासह इतर मुलींचीही या कोंडवाडय़ातून सुटका करते. एकुणात पाचच पात्रे. सर्वाचा अभिनय सहज होता. पाश्र्वसंगीत एकांकिकेला साजेसे होते. नेपथ्य ही एकांकिकेची जमेची बाजू ठरली. वातावरणाला कमालीचे पोषक परंतु सुटसुटीत नेपथ्याने वेश्यावस्तीचा माहोल प्रभावीपणे उभा केला.

* सवरेत्कृष्ठ दिग्दर्शक
श्रुती देशमुख (‘चिमणी चिमणी खोपा दे’, अहमदनगर महा.)
* सवरेत्कृष्ठ लेखक
अमोल साळवे (कोंडवाडा, पोराज सारडा कॉलेज, नगर)
* सवरेत्कृष्ठ अभिनय
अनुजा पटाईत (चिमणी चिमणी खोपा दे, अहमदनगर महाविद्यालय) श्रावणी एडके (कोंडवाडा, पेमराज सारडा महाविद्यायल)
* सवरेत्कृष्ठ प्रकोश योजना
विकास लोखंडे, अक्षय चौधरी (कोंडवाडा, पेमराजड सारडा महाविद्यालय)
* सवरेत्कृषेठ नेपथ्य
अश्लेषा कुलकर्णी (कोंडवाडा, पेमराज सारडा महाविद्यालय)
* सवरेत्कृष्ठ संगीत
शशिकांत धाडगे (‘चिमणी चिमणी खोपा दे’, अहमदनगर महाविद्यालय)

नात्यातील ‘दुरावा’ मांडणारी ‘बीईंग सेल्फिश’
ek03इंटरनेट व मोबाईलचे व्यसन जडलेली आजची तरुणाई व त्यामुळे दुरावलेली नाती यांचे चित्रण करत मोबाईल किंवा संगणकावरील बोटांच्या भाषेपेक्षा प्रत्यक्ष संवादाचे महत्त्व अधोरेखित करणारी एम. एल. डहाणूकर महाविद्यालयाची ‘बीईंग सेल्फिश’ ही एकांकिका ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई विभागीय अंतिम फेरीत सवरेत्कृष्ट ठरली. रविवारी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात मुंबईची विभागीय अंतिम फेरी पार पडली. ‘बीईंग सेल्फिश’ने सवरेत्कृष्ट एकांकिकेसह सवरेत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनाच्या वैयक्तिक पारितोषिकांवरही आपले नाव कोरले. ‘डझ नॉट एक्झ्स्टि’ (कीर्ती महाविद्यालय) या एकांकिकेला दुसरा क्रमांक मिळाला. तर साठय़े महाविद्यालयाच्या ‘दस्तुरखुद्द’ला तिसरा क्रमांक मिळाला.

* सवरेत्कृष्ट नेपथ्य
हर्षद माने, विशाल
नवाथे (बीईंग सेल्फिश)
* सवरेत्कृष्ट
प्रकाश योजना
जयदीप आपटे (बीईंग सेल्फिश)
* सवरेत्कृष्ट अभिनय
सिद्धी कारखानीस
(दस्तुरखुद्द), कुणाल शुक्ल (बीईंग सेल्फिश)
* सवरेत्कृष्ट संगीत
समीहन (बीईंग सेल्फिश)
* सवरेत्कृष्ट लेखक
तुषार जोशी (बीईंग सेल्फिश)
* सवरेत्कृष्ट दिग्दर्शक
सुशील, कुणाल, पराग
(बीईंग सेल्फिश)

परीक्षक
अभिराम भडकमकर : लेखक, कथाकार, नाटककार आणि अभिनेते. अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या पटकथांचे लेखनही केले आहे.

दत्ता पाटील – नाटय़लेखन व दिग्दर्शन क्षेत्रातील प्रसिद्ध असामी,  मध्यमपदलोपी, कृष्णविवर, ब्लॅक आऊट यांसारख्या नाटकांचे लेखन.
*******

कमलाकर नाडकर्णी : ‘लिटील थिएटर’ या बाल रंगभूमी चळवळीतून पुढे आलेले नाव, आज महाराष्ट्रातील अग्रगण्य नाटय़ समीक्षकांमध्ये यांची गणना होते.

चारुदत्त लक्ष्मण कुलकर्णी – नाशिक येथे गेल्या अनेक वर्षांपासून लेखन, नाटय़, चित्र, संगीत अशा क्षेत्रातील आघाडीचे नांव. विविध कार्यक्रमांच्या आयोजनांत प्रत्यक्ष सहभाग.
*******

अशोक समेळ : ज्येष्ठ रंगकर्मी. समेळ हे उत्तम लेखक, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, कथाकार म्हणून सर्वपरिचित आहेत.

आप्पा रणपिसे :  पाटबंधारे खात्यात सेवेस, १९७८ पासून हौशी रंगकर्मी म्हणून रत्नागिरीत सक्रीय, स्टार थिएटर या नाटय़गटाची स्थापना.
*******
शांता गोखले: ज्येष्ठ समीक्षक व लेखिका, ‘रिटा वेलणकर’ या गाजलेल्या कादंबरीच्या लेखिका शांता गोखले या नाटय़ समीक्षक म्हणून परिचित आहेत. पटकथा लेखिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

वसंत दातार : गेली २५ वर्षांहून अधिक काळ मराठवाडय़ातील नाटय़चळवळीत सहभागी. अनेक नाटय़स्पर्धामध्ये परीक्षक म्हणून अनुभव
*******

माधव वझे – ‘श्यामची आई’ सिनेमात श्यामची भूमिका वझे यांनी साकारली होती. सध्या ‘हॅम्लेट’ हे नाटक रंगमंचावर घेऊन येण्याच्या प्रयत्नांत आहेत.

रोहित देशमुख – औरंगाबादेत नाटय़चळवळीशी जोडलेले नांव. सध्या ‘जय मल्हार’ या मालिकेत कुंभक ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.
*******
अशोक पाटोळे : मराठी रंगभूमीवरील प्रयोगशील नाटककार म्हणून सर्वाच्याच परिचयाचे, ‘चौकट राजा’ हा त्यांचा चित्रपट . सध्या ‘आई तुला मी कुठे ठेवू’ हे नाटक चर्चेत.

अनिल दांडेकर – शासकीय सेवेत असूनही रंगभूमीवर प्रेम करणारी व्यक्ती. रत्नागिरी अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे पदाधिकारी.
*******

आनंद म्हसवेकर : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि रंगकर्मी. एक सर्जनशील कलावंत आणि कल्पक दिग्दर्शक म्हणून जनमानसातील प्रसिद्ध नांव.

प्रसाद वनारसे : इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिग आर्ट्स अँड रिसर्चचे संचालक रंगकर्मी लेखन, दिग्दर्शनात हातखंडा. राज्यातील रंगकर्मीसाठी अनेक चळवळी सुरू केल्या.
*******
देवेंद्र पेम : गाजलेल्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचे दिग्दर्शक, एक निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून सर्वत्र सुपरिचित नांव

रूपाली मोरे : राज्य नाटय़, व्यावसायिक आणि झाडीपट्टी, अशा तिन्ही रंगभूमीवर त्यांचा प्रवास आहे. राज्य नाटय़स्पध्रेत त्यांनी अभिनयातील सुवर्णपदक पटकावले आहे. सध्या व्यावसायिक चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले  आहे.

नागराज मंजुळे : यंदा सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक, प्रयोगशीलता हे यांचे आगळेवेगळे वैशिष्टय़.

श्रीपाद प्रभाकर जोशी
राज्य नाटय़ ते व्यावसायिक रंगभूमीवर लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयात अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले. ११ नाटके, एक कवितासंग्रह आणि एक कथासंग्रह प्रसिद्ध आहे.  
*******
मकरंद खेर: राष्ट्रपती पदक विजेते सेवानिवृत्त शिक्षक. हौशी रंगभुमीवर कार्यरत. प्रायोगिक २० नाटकांमध्ये विविध भूमिका केल्या.

पी. डी. कुलकर्णी- हौशी रंगभुमीवर ४० वर्षे सक्रिय. नगर शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी. कलायात्रिक नाटय़ संस्थेचे कार्याध्यक्ष. अखिल भारतीय माठी नाटय़ परिषदेच्या नगर शाखेसह शहरातील विविध नाटय़ संस्थांचे सल्लागार.

ek02नाटकासाठी व्यावसायिक रंगभूमी हा एकमेव पर्याय असता कामा नये. नाटकाच्या वेगवेगळय़ा शक्यता तपासून पाहण्यासाठी वेगळय़ा व्यासपीठाची गरज असून त्यामुळे मराठी रंगभूमीवर समांतर किंवा प्रायोगिक रंगभूमीसाठी स्वतंत्र चळवळ उभारण्याची गरज आहे. आपले महाराष्ट्र राज्य हे एकमात्र असे राज्य आहे की येथे १७५ वर्षे नाटकाची परंपरा जिवंत आहे. राज्य नाटय़ स्पर्धेच्या माध्यमातूनही दरवर्षी सुमारे साडेचारशे नवीन नाटके सादर होत आहेत. जगातील हे असे एकमेव उदाहरण आहे.
वामन केंद्रे, एनएसडी संचालक

ek01लोकांकिका’ हा शब्द खूप आवडला. आजची तरूणाई उद्याच्या रंगभूमीची आशा आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल. ‘लोकसत्ता लोकांकिका’ पहिल्याच वर्षांत महाराष्ट्रभर सादर होत असल्याचे पाहून मन भरून आले. या उपक्रमातून तरूणाईला व्यासपीठ मिळणार असल्याने तो पुढे गेला पाहिजे. तसेच त्यांच्या धडपडीतून उद्याची रंगभूमी प्रगत होणार आहे.
– अरुण काकडे