‘ज्ञानवानेन सुखवान् ज्ञानवानेव जीवति।
ज्ञानवानेव बलवान् तस्मात् ज्ञानमयो भव?’
अर्थात ‘ज्ञानवंत माणूस सुखी असतो आणि ज्ञानवंत असल्यानं खऱ्या अर्थानं तो जगतो. जो ज्ञानी असतो, तो बलवान ठरतो. म्हणून तू ज्ञानसमृद्ध हो.’ आजच्या लेखाच्या सुरुवातीस हे संस्कृत सुभाषित पाहून गोंधळू नका. ते द्यायचं कारण ठरल्येय संस्कृतप्रेमी ऐश्वर्या पटवर्धन! ती ‘रामनारायण रुईया कॉलेज’मध्ये एस.वाय.बी.ए.ला आहे. सायकॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स आणि संस्कृत हे तिचे मुख्य विषय असून टी.वाय.ला ती सायकॉलॉजी विषय घेणारेय. शाळेपासूनच संस्कृतची आवड असणाऱ्या ऐश्वर्याला योगायोगानं महिन्याभराच्या ‘संस्कृत टिचर्स ट्रेिनग कोर्स’बद्दल कळल्यावर तिनं तो अटेंड केला. त्यानंतर ‘आदर्श क्लास’च्या व्हेकेशन बॅचमध्ये तिनं पहिल्यांदा शिकवलं. पुढं २०११ पासून ती ‘अश्वमेध फाऊंडेशन’मध्ये शिकवत्येय. दुपापर्यंत कॉलेज आणि संध्याकाळी क्लास असल्यानं वेळ व्यवस्थित अ‍ॅडजस्ट होतो. ती सांगते की, ‘मी शिकतेय आणि शिकवतेय. त्यामुळं विद्यार्थी आणि शिक्षकांचीही मानसिकता कळत्येय. शिकवताना विद्यार्थ्यांच्या मनात काय चालू असेल, ते एक विद्यार्थी म्हणून लक्षात येतं. शिकवताना किती कष्ट घ्यावे लागतात, हे कळल्यामुळं विद्यार्थी म्हणून शिक्षकांबद्दलचा आदर आणखीनच वाढलाय.’
ऐश्वर्या आठवी, नववी, दहावीच्या इंग्रजी माध्यमाच्या पूर्ण संस्कृतच्या बॅचेस घेते.’
आजच्या पिढीतल्या मुलांना काही वेळा फिल्मी किंवा स्पोर्ट्स लाइफमधली त्या धडय़ाशी रिलेट होणारी उदाहरणं द्यावी लागतात. अर्थात ही उदाहरणं कोणती द्यावीत आणि त्यात फार न रमता मूळ अभ्यास विषयाकडं चटकन वळण्याचं भानही ठेवावं लागतं. कुणी मला ‘टीचर’ तर कुणी ‘ताई’ म्हणतात. शिक्षकदिनाला आठवीच्या विद्यार्थ्यांनी मला कार्ड आणि फुलं दिली होती. माझ्या शिकवण्याला दिलेली एक दादच जणू! पण असं असलं तरी थोडंसं अंतर राखून वागता यायला हवं. आपलं ‘शिक्षकपण’ही जपता यायला हवं. तरच मुलं आपल्याला शिक्षक म्हणून बघतात नि आदर देतात,’ असं तिला वाटतं.
शिकवताना तिला खूप तयारी करावी लागत नाही. कारण यातला बराच अभ्यासक्रम ती शाळेत असतानाचा आहे. ती जे शिकलेय, तेच शिकवायचं असतं. व्याकरणाचा एखादा भाग कठीण वाटला तर स्वत: शाळेत असताना काढलेल्या नोट्स वाचते. इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना काही टॉपिक्स शिकवताना कठीण जातं. कारण आपल्या संस्कृतीमधल्या काही संकल्पना मुळात इंग्रजीत नाहीत. त्यामुळं त्यांचं अगदी शब्दश: भाषांतर करता येत नाही. त्यामुळं थोडं सविस्तरपणं समजावून सांगावं लागतं.
ती पुढं संस्कृतच शिकवणार आहे असं नाही. पण शिक्षकी पेशात कदाचित काहीतरी कंटिन्यू करणारेय. कारण ते तिला आवडतं आणि जमतंही. पण त्याबाबतीत काही पक्कं ठरलेलं नाहीये. ऐश्वर्या सांगते की, ‘शिकवण्यामुळं माझा व्यक्तिमत्त्व विकास झाला. संवादकौशल्य आणखी वाढलं. एकाच वेळी २० विद्यार्थ्यांच्या बॅचला शिकवण्यानं खिळवायचं असतं. त्यासाठी चांगलं वक्तृत्व आणि समोरच्याच्या मनाचा कौल कळणं आवश्यक ठरतं. पुढं नोकरीच्या दृष्टीनं ते फायदेशीर ठरतं.’ या सगळ्यासाठी तिला घरून चांगला सपोर्ट होतो. तिच्या घरी आजी-आजोबा नि आई-वडील अशी ज्ञानसमृद्ध शिक्षकी पेशाची परंपरा आहे. लहानपणापासूनच तिच्याकडून स्पर्धासाठी संस्कृत श्लोक आणि गोष्टींचं पाठांतर करून घेतलं जाई. आता कॉलेजमध्येही ती सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होते. ‘इंडियन व्हिसलर्स असोसिएशन’ची ती सभासद आहे. केवळ गाणंच नव्हे तर गाण्यातलं संगीतही शिट्टीवर वाजवण्याचं कसब तिनं आत्मसात केलंय. तिला गायन, वाचन आणि लिखाणाचीही खूप आवड आहे.
‘पहिल्यांदा शिकवायला लागले तेव्हा स्वकमाईची किंमत कळली. पशांचं महत्त्व ध्यानी आलं. हे पसे मी साठवून त्यातून ड्रायिव्हग शिकले. स्वत:च्या मेहनतीनं कमावलेल्या पशांतून आणखीन काहीतरी शिकायला मिळण्याचा आनंद काही औरच होता. अलीकडं आपल्याकडं परदेशासारखं इंटरशिप किंवा समरजॉबचं फॅड आलंय नि ते रुजू पाहतंय. स्वत: शिकणं आणि कमावणं ही छान कल्पना आहे. ही किती महत्त्वाची गोष्ट आहे, हे आमच्या पिढीला उमगतंय. अशा ‘लर्न अँण्ड अर्न’ करणाऱ्यांची संख्याही हळूहळू वाढत्येय’, असं ऐश्वर्या म्हणते.
कोर्समध्ये शिकताना तिनं वर्गाला शिकवलं होतं. पण ती फक्त प्रॅक्टिस होती. क्लासमध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्यांसमोर शिकवायला उभी राहिली तेव्हा थोडासा गोंधळ उडाला होता. पण ते तेवढंच. पुढं शिकवताना व्यवस्थित शिकवता आलं. ती सांगते की, ‘मुलांना शिकवताना हजरजबाबीपणानं उत्तर द्यावं लागतं. मी शालेय विद्यार्थी असताना मला न पडलेले प्रश्न हे विद्यार्थी विचारतात. या अनपेक्षित प्रश्नांवर विचार करून उत्तरं द्यावी लागतात नि त्यातून मलाही खूप काही शिकायला मिळतं. ही खरी कसोटीची वेळ असते. तेव्हा केवळ वेळ मारून न नेता त्यांच्या शंकांचं व्यवस्थित निरसन होईल, असं उत्तर द्यावं लागतं. त्यांचे पेपर सेट करतानाही मजा येते. पोर्शन वेगळा असला तरी एकूण पेपर तपासणाऱ्यांचा दृष्टिकोन काय आहे, हे त्यातून कळल्यामुळं आपली उत्तरं कशी असावीत, ते समजतं.’
ती सांगते की, ‘अभ्यासाविषयीचे प्रश्न विचारण्याऱ्या आठवी नि नववीतल्या विद्यार्थ्यांना हॅण्डल करणं तसं सोपं असतं. दहावीतल्यांना कॉलेजचे वेध लागलेले असल्यानं त्यांच्याशी डील करणं बऱ्यापकी कठीण जातं. त्यांचे अभ्यासाविषयीचे प्रश्न वेगळे असतात. त्यांना समंजसपणं त्यांच्या लेव्हलला येऊन विषय समजावा लागतो. त्याशिवाय प्रत्येकाची कुवत वेगवेगळी असते, हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या तऱ्हेनं उदाहरणं देऊन समजावून सांगावं लागतं. एका अर्थी हा अभ्यास असला तरी संस्कृत शिकवण्याचा कधीच कंटाळा येत नाही. उलट जाणवतं की, शिकवायला लागले की दुसरे कोणतेही विचार मनात येत नाहीत. केवळ शिकवण्यावरच लक्ष केंद्रित होतं. अगदी मी माझ्या परीक्षेसाठीचा अभ्यास करते, तेव्हाही असं होत नाही. मुलांना समजावताना एकीकडं माझाही अभ्यास होतो. विद्यार्थी आणि शिक्षक या भूमिका मी सहजगत्या वेगळ्या ठेवते. त्या त्या कप्प्यांशी ती समरस होते.’
ऐश्वर्याच्या ग्रुपमध्ये ती पहिल्यांदा कमावायला लागलेय. आणखी दोघी मत्रिणीही शिकवतात. मग त्यांच्या गप्पांमध्ये एकमेकींच्या शिकवण्याबद्दल, मुलांना द्यायच्या उदाहरणांबद्दल वगरे विषय ओघानंच येतात. कधी क्लासमध्ये एखादी गमतीशीर घटना घडली तर ती लगेच मत्रिणींशी शेअर केली जाते. संध्याकाळी बाहेर जायचं असेल, क्लासची वेळ लक्षात ठेवून तसं शेडय़ूल त्या आखतात. ऐश्वर्या सांगते की, ‘मी शिकवतेय’ हे सांगताना एक प्रकारचा अभिमान वाटतो. हे ‘शिकणं नि शिकवणं’ मी मन:पूर्वक एन्जॉय करतेय..’

लर्न अ‍ॅण्ड अर्न या नव्या कॉलममधून तुम्हाला तुमच्या अशा काही मित्रांना आणि मैत्रिणींना भेटायला मिळणारेय जे शिकताना स्वतची आवड जपत आहेत. अर्थात ही आवड म्हणजे केवळ छंद जोपासण्याइतपत मर्यादीत नाही तर ही आवड आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याची आहे. तरूणांमध्ये अलीकडे लर्निग प्लस अर्निग हे चित्र दिसून येत आहे. पूर्वी केवळ समर जॉब करणारे चेहरे आता कॉलेजच्या लेक्चर्ससह इतर जॉबसाठीही वेळ देत आहेत. अशाच तरूणांची आणि त्यांच्या कामाची महती आपण जाणून घेऊया. यासंदर्भात आपणास मेल करावयाचे असल्यास viva.loksatta@gmail.com या संकेतस्थळावर माहिती पाठवावी. कॉलमचे नाव लर्न अ‍ॅण्ड अर्न असे टाकावयास विसरू नये.

maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti offer cash reward for predict correctly voting
कंगना, गडकरी, राहूलना मते किती मिळतील ते अचूक सांगा, २१ लाख रुपये बक्षिस मिळवा – अंनिसचे ज्योतिषांना आव्हान
loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!