आजची तरुणाई म्हणजे स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली तिसरी- चौथी पिढी. ही पिढी स्वतंत्रपणे विचार करते, स्वच्छंदी जगते आणि मुख्य म्हणजे त्यांना स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्यही मिळतंय. भारताच्या ‘जेन नेक्स्ट’चं हेच तर वैशिष्टय़ आहे. कुठल्याही रुळलेल्या वाटेचं बंधन झुगारत, स्वतंत्रपणे पाहिलेलं स्वप्न जिद्दीनं साकारणाऱ्या तीन तरुण यशस्विनींची वाटचाल.. आजच्या
स्वातंत्र्य दिन विशेषांकाच्या निमित्ताने.