लोकसभा निवडणुकांमध्ये जातीच्या आधारे मतं मिळणार नाहीत हे शरद पवारांना समजू लागलं आहे. त्याचमुळे जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करत आहे असा टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लगावला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना तावडे म्हटले की जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करा असे आवाहन पवार यांनी केले आहे. पण पवारांच्या तोंडी हे वाक्य आल्यावर लोकांना ठाऊक असते की पवार यांचे म्हणणे काय? शिरूरचा उमेदवार देताना काय विचार केला होता? मातीचा की जातीचा? असाही प्रश्न विनोद तावडेंनी विचारला आहे.अजित पवार यांनी आता पर्यंतच्या निवडणुकांमध्य़े साम दाम दंड भेद याचाच वापर केला. गेल्या खेपेस लोकसभा निवडणुकीत त्यांची क्लिप वायरल झाली होती, त्यात ते काय बोलले होते ते त्यांनी जरा आठवून बघावे, विनाकारण दुस-यांवर आरोप करू नये, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.