टेडी बिअर कोणाला आवडत नाही. प्रामुख्याने लहान मुलं-मुली आणि तरुणींना टेडी बिअर खूप आवडतात. लहान मुलांना टेडी बिअरसोबत खेळायला खूप आवडतं. परंतु असं होऊ शकतं का? एखाद्या व्यक्तीचा टेडी बिअरवर जीव जडला आणि त्या व्यक्तीने टेडी बिअरला आपला लाईफ पार्टनर मानलं तर? हे वाचून तुम्हाला कदाचित हसू येऊ शकतं. परंतु अशा एका अजब लव्ह स्टोरीची सर्वत्र चर्चा आहे.

एका पाकिस्तानी महिलेने दावा केला आहे की, तिच्या पतीच्या निधनानंतर ती गेल्या १० वर्षांपासून एका टेडी बिअरसोबत राहतेय. तिने त्या टेडी बिअरलाच आपला लाईफ पार्टनर बनवलं आहे. महिलेच्या या अजब प्रेम कहानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण चकित झाले आहेत.

या महिलेच्या अनोख्या प्रेम कहाणीचा व्हिडीओ एक यूट्युब चॅनेल सोशल क्लिकवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिची लव्ह लाईफ आणि आयुष्याबद्दल बिन्धास्तपणे व्यक्त होत आहे. तसेच ती या टेडी बिअरवर इतकं प्रेम का करते याबद्दल देखील तिने व्हिडीओत माहिती दिली आहे.

हे ही वाचा >> गर्लफ्रेंडला कारमध्ये बसवलं, निर्जन स्थळी नेलं आणि ५० लाखांची मर्सिडीज पेटवली

“टेडी बिअर रागवत नाही, ओरडत नाही”

ही महिला सांगते की, टेडी बिअर तिचा पार्टनर आहे. ती तिच्या सर्व गोष्टी त्याच्यासोबतच शेअर करते. तिने तिच्या यशाचं श्रेय देखील त्या टेडी बिअरला दिलं आहे. तिचं म्हणणं आहे की, टेडी बिअर तिची प्रत्येक गोष्ट ऐकतो. तिला उलट उत्तर देत नाही. तो तिच्यावर रागवत नाही, तिला ओरडत नाही. परंतु नवरे असं करतात. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, ती महिला टेडी बिअरसाठी गाणं देखील गाते. तसेच मुलाखत घेणारा पत्रकार टेडी बिअरला काहीतरी बोलून जातो, तेव्हा ती पत्रकारावर संतापते.