-
टीव्ही जगतातील अभिनेत्री बॉलिवूडच्या अभिनेत्रींनप्रमाणे प्रसिद्ध आहेत. बिग बॉस विजेती उर्वशी ढोलकिया सातत्याने चर्चेत येत असते.
-
‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली उर्वशी ढोलकिया सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते.
-
उर्वशीने नुकतेच व्ही नेक असलेल्या ड्रेसवर फोटोशूट केले आहे. फोटो शेअर करताना उर्वशीने लिहिले की, “चॅनेलिंग माय इनर #marilynmonroe.” असा कॅप्शन दिला आहे.
-
तिने प्रसिद्ध मर्लिन मन्रो या अभिनेत्रीसारखा लूक केला आहे. तिच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
-
तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटन्सचा वर्षाव केला आहे, एकाने लिहले आहे “खूप सुंदर तर दुसऱ्याने लिहले आहे, बोल्ड लूक सुट करतोय.”
-
आणखीन एकाने लिहले आहे “हिने तर आग लावली आहे कोणीतरी अग्निशामक दलाला फोन करा,” तिसऱ्याने लिहले आहे “मर्लिन मन्रोसारखीच सुंदर दिसत आहे.”
-
आज तिच्याबाबत एक दुर्दैवी घटना घडली. तिच्या कारला अपघात झाला आहे. अभिनेत्रीच्या कारला एक बसने धडक दिली.
-
तिच्या कारमधून चित्रीकरणासाठी जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या स्कूल बसने अभिनेत्रीच्या कारला धडक दिली. डॉक्टरांनी काही दिवस बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे.
-
उर्वशीची ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेत कोमोलिका ही खलनायकेची भूमिका साकारली होती. तसेच ‘नागिन’ मालिकेत अभिनेत्री झळकली होती. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

Maharashtra SSC Result 2025 Live Updates: विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला! थोड्याच वेळात जाहीर होणार दहावीचा निकाल, मोबाईलवर सर्वात आधी ‘असे’ पाहा गुण