बिग बॉस मराठी ३ या कार्यक्रमात सहभागी झालेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिच्या गाडीचा भीषण अपघात झाला. मीराने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली. या अपघातात मीरा ही सुदैवाने बचावली आहे. पण तिने घेतलेल्या नव्या गाडीचे प्रचंड नुकसान झालं आहे.
अभिनेत्री मीरा जगन्नाथने हिने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. त्यात तिने पोस्ट शेअर करत या अपघाताबद्दलची माहिती दिली होती. यावेळी मीराने तिच्या गाडीचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
“माझा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. देवाचे आभार. मित्रमंडळी, नातेवाईक आणि फॅन्सच्या प्रेमामुळे मी अगदी सुखरूप आहे. तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या, अशी पोस्ट मीराने केली होती.
मीराने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या गाडीला मागून कोणीतरी धडक दिल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या गाडीचा अपघात नेमक्या कोणत्या मार्गावर झाला याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र या अपघातात मीराच्या गाडीचा मागचा भाग संपूर्ण नुकसानग्रस्त झाला आहे. यावेळी मीराच्या गाडीचं नुकसान झालं असलं, तरी सुदैवाने मीराला कोणतीही दुखापत झालेली नाही.
दरम्यान मीराने अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच डिसेंबर महिन्यात दत्तजयंतीच्या मुहूर्तावर नवी गाडी खरेदी केली होती. या अपघातात या नव्या कोऱ्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. मीरा बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी होती. त्याबरोबरच बिग बॉस मराठी ४ च्या घरात मीरा ही एक आठवडा चॅलेंजर म्हणून सहभागी झाली होती. मीराने या काळात संपूर्ण घर दणाणून सोडलं. सध्या मीरा ही स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत झळकत आहे. त्यात तिने साक्षी हे पात्र साकारलं आहे.