‘कच्चा बादाम’ गाण्यामुळे रातोरात स्टार झालेले भुबन बड्याकार यांची परिस्थिती बिकट झाली आहे. ज्या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली, तेच गाणं गाण्यात त्यांना अडचण येत आहे. भुबन बाम यांनी त्यांच्याबरोबर फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. भुबन बड्याकार यांच्या गाण्याचा दुसऱ्याने कॉपीराइट घेतला आहे. त्यामुळे त्यांना ते गाणं गाता येत नाही. सोशल मीडियावर ते गाणं पोस्ट केल्यावरत्यांना कॉपीराइट पाठवला जात आहे. यामुळे त्यांच्या अडचणी वाढली आहेत. गाणं गाता येत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणंही कठीण झालं आहे, तसेच त्यांना कुठेच शो करता येत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

शाहरुख खानची पत्नी गौरी खानविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

त्यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितलं की, गोपाल नावाच्या व्यक्तीने त्यांना ३ लाख रुपये देत हे गाणं त्याच्या यूट्यूब चॅनलवर चालवणार असल्याचं सांगितलं होतं. त्यासाठी त्यांना हे पैसे दिले होते. पण आता भुबन जेव्हाही हे गाणं गातात आणि पोस्ट करतात, तेव्हा कॉपीराइट इश्यू येतो. आपल्या गाण्याचे कॉपीराइट त्या व्यक्तीने विकत घेतल्याचं त्यांनी सांगितलं. ‘त्या व्यक्तीने पैसे देताना काही कागदपत्रांवर माझ्या सह्याही घेतल्या होत्या. मी अशिक्षित आहे. मला हे सर्व समजत नाही आणि यामुळे माझा गैरफायदा घेतला गेला आहे, असं भुबन म्हणाले.

थिएटरमध्ये सीटखाली सापडलेली चिमुरडी; उंदरांनी कुरतडलेलं शरीर, प्रकाश झा यांनी दत्तक घेतली होती लेक दिशा

प्रसिद्धी मिळाल्यानंतर भुबन यांनी गावात घर बांधण्याचा विचार केला होता, पण आता परिस्थिती पुन्हा बिघडली आहे. कॉपीराइटमुळे गाता येत नाही, परिणामी कामही मिळत नाही. “सध्या काम मिळत नाही. आता मी शोमध्ये ते गाणंही गाऊ शकत नाही. छोटं-मोठं काम करून महिन्याला काही हजार रुपये कमावतो. त्यातूनच उतरनिर्वाह करतोय. हे अजून किती दिवस चालेल माहीत नाही,” हे सांगताना भुबन भावूक झाले आणि रडू लागले.