मागील काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमधील वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे दिल्ली मेट्रोत लोक प्रवास करण्यासाठी कमी आणि रील बनवण्यासाठी जास्त येत असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय या रीलमुळे अनेकांचे मनोरंजन होत आहे तर काहीजण अशा व्हिडीओंवर संताप व्यक्त करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी असे व्हिडीओ शूट करणं चुकीचं असल्याचं काहींचं मतं आहे.

कारण काही दिवसांपुर्वी काहीतरी वेगळा स्टंट करायचा म्हणून एक मुलगा चक्क टॉवेल बनियान घालून मेट्रोमध्ये चढला होता. या मुलाच्या कृतीचे काही लोकांनी समर्थन केले तर काहींनी त्याला ट्रोल केलं होतं. शिवाय अनेकांनी तर त्या मुलावर कारवाई करावी नाहीतर लोक दिल्ली मेट्रोला ‘रीलचा अड्डा’ बनवतील असंही म्हटलं होतं.

हेही पाहा- घरातून ऑफिसला निघालेल्या व्यक्तीला लिफ्टजवळच मृत्यूने गाठलं; हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल

अशातच आता आणखी एका मुलाचा दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मेट्रोतील रिकाम्या सीटवर जातो आणि चक्क त्यावर उशी आणि चादर घेऊन इतर प्रवाशांसमोर झोपल्याचं पाहायला मिळत आहे. हा मुलगा घरी बिछान्यावर ज्या प्रमाणे झोपतात अगदी तसा झोपल्याचं दिसत आहे. हे पाहून मेट्रोमध्ये उपस्थित प्रवासी थक्क झाले. तर काही जणांना ते दृश्य पाहून आपलं हसू आवरणं कठिण झालं होतं.

हेही पाहा- महिलेने दोन वर्ष ज्याला कुत्रा म्हणून सांभाळले तो निघाला भलताच प्राणी; विचित्र घटना होतेय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचा व्हिडीओ mohitgauhar नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘हिवाळ्यात सिंगल बॉईज.’ आतापर्यंत या व्हिडीओला ९० हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर या व्हिडीओवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं आहे की, भाऊ आता असले व्हिडीओ बनवणं बंद करा, तर आणखी एकाने मेट्रो प्रवासासाठी आहे का रील बनवण्यासाठी? असा प्रश्न विचारला आहे.