भारतीय जनता पार्टी (BJP) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे. २०१४ सालापासून सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपाचे बहुमत मिळवत सत्ता राखली. नरेंद्र मोदी भाजपाचे सर्वोच्च नेते असून अमित शाह दुसऱ्या पातळीवरचे नेते मानले जातात. तर जेपी नड्डा हे भाजपाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत फूट पडली आणि त्यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेसबरोबर युती करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली.
जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.
१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (Bhajapa) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थॅंवरचंद गेहलोत, शिवराजसिंग चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत. Read More
शिरूरमधून मागीलवेळी भाजप-शिवसेना युतीकडून लढलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Shivsena Workers Spits On Sanjay Raut Face Banner: ‘संज्या ओढतो गांजा’ म्हणत पुण्यात बॅनरबाजी सुरु असतानाच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या…
राज ठाकरेंनी दोन हजार रुपयांच्या नोटपासून त्र्यंबकेश्वर धार्मिक तणाव, कर्नाटक निवडणूक, कोकणातील प्रकल्प, भाजपाने केलेली टीका, ईडी-सीबीआयचा वापर अशा अनेक…
Karnataka Election Results 2023 : कर्नाटकमधील २२४ विधानसभा मतदारसंघाच्या मतदानाचे निकाल आज येत आहेत. काँग्रेसने बहुमतासाठी लागणाऱ्या आकड्याच्या पुढे जाऊन…
शरद पवारांच्या राजीनाम्यापासून सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपांचा आणि दावे-प्रतिदाव्यांचा कलगीतुरा अद्याप थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत. आधी पवारांच्या राजीनाम्यावर, त्यानंतर राजीनामा…
Satyapal Malik Interview: गोवा, जम्मू-काश्मीर या राज्यांचं राज्यपालपद भूषवलेले ज्येष्ठ भाजपा नेते सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी…
उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मशिदीला भेट देण्यापासून फडणवीसांच्या बाबरी मशीद दाव्यापर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केलं.…
कोल्हापूर शहरातील एका गटाच्या तरुणांनी व्हाट्सअॅपवर ठेवलेल्या वादग्रस्त स्टेटसमुळे मोठा तणाव निर्माण झाला. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक झाली.…
राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सध्या बरेच तर्क वितर्क लढवले जात आहेत. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत…
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशावरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला असता…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाद्वारे दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडेसह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,…
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आज आहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या…
नमो शेतकरी सन्मान योजनेची घोषणा राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती. ३० मे रोजी मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीचा…