scorecardresearch

देवेंद्र फडणवीस


देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य आहेत. त्यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि वयाच्या ४४ व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. त्यांची २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली.

फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. कायद्यातील पदवीधर, डहलम स्कूल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते १९९८ मध्ये जर्मनीला गेले होते. २००६ मध्ये त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगी आहे.

त्यांनी आपली राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मध्ये सुरू केली आणि १९९० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये सामील झाले. त्यांनी नागपूरच्या राम नगर प्रभागातून त्यांची पहिली महापालिका निवडणूक जिंकली आणि १९९२ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९७ मध्ये, ते नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर आणि भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर बनले. १९९९ पासून ते २००४ पर्यंत सलग तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा जागेवरुन २०१९ मध्ये ते पुन्हा निवडून आले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबतची युती विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर शपथ घेतल्यानंतर तीन दिवसांनी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

Read More
devendra-fadnavis
“नरेंद्र मोदींच्या संकल्पपूर्तीसाठी महात्मा गांधींनी आशीर्वाद द्यावा,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मागणे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानणारे तसेच त्यांचे अनुयायी गांधी विचारांची कितीही थट्टा उडवीत असले तरी फडणवीस यांना मात्र गांधी वंदनीय…

devendra fadnavis supriya sule
“मला आनंद आहे की सुप्रिया सुळेंना इतक्या…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले, “हे त्यांच्या लक्षात येतंय…!”

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “मला एका गोष्टीचा आनंद आहे की इतक्या वर्षांनंतर का होईना, सुप्रिया सुळेंना…!”

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

स्वतःच्या अकलेचं सार्वजनिकरित्या प्रदर्शन करण्यापूर्वी जे करताय ते कितपत योग्य आहे याचा एकदा तरी विचार नक्कीच करा.

devendra fadnavis criticized aditya thackeray
‘वाघनखा’वरून फडणवीस विरुद्ध आदित्य

मंत्र्यांच्या परदेश दौऱ्याबद्दल ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मी बालबुद्धीला उत्तर देत नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. 

aaditya thackeray
“आदू बाळानं सरकारला सळो की पळो करून सोडलं”, भाजपाच्या ‘त्या’ टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

“देशात ‘पप्पू’नं सरकारला हलवून सोडलं आहे”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Devendra fadnavis aaditya thackeray
VIDEO : “वाघनखे शिवाजी महाराजांची की शिवकालीन?” आदित्य ठाकरेंच्या विधानाला फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…

लंडनहून आणण्यात येणाऱ्या वाघनखांवरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

dcm devendra fadnavis on OBC reservation
Devendra Fadnavis on OBC Reservation: ओबीसींच्या आरक्षणावर फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राष्ट्रीय ओबीसी मोर्चा महासंघाचं अन्नत्याग आंदोलन सुरू होतं.…

devendra-fadnavis
“सर्वप्रथम तुम्ही रुग्णालयात जा,” उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा रवींद्र टोंगे यांना प्रेमाचा सल्ला, म्हणाले…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन लिंबू पाणी देवून सोडल्यानंतर त्यांना…

Devendra Fadnavis on OBC reservation
“ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; म्हणाले, “मराठा समाजाचा..”

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष रवींद्र टोंगे यांना लिंबू पाणी देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणाची सांगता केली.

devendra fadnavis obc protest withdraw
ओबीसी आंदोलन मागे; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका आहे, पण…”

सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर रवींद्र टोंगे यांच्यासह ओबीसी नेत्यांनी उपोषण मागे घेतलं आहे.

ravindra tonge hunger strike, dcm devendra fadnavis chandrapur visit, deputy cm devendra fandavis to end hunger strike of ravindra tonge
टोंगेचे उपोषण सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री शनिवारी चंद्रपूरात, ओबीसींच्या मागण्या तोंडी मान्य!

मागील १९ दिवसांपासून सुरू असलेले रविंद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सोडविण्यासाठी ३० सप्टेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळी ९ वाजता…

Eknath SHinde
अजित पवार गणपती दर्शनासाठी फडणवीसांच्या घरी गेले पण मुख्यमंत्र्यांकडे का गेले नाहीत? दीपक केसरकर म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली होती.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×