यवतमाळ : बार्टी द्वारा संचालित यवतमाळ येथील बँकिंग, रेल्वे, एल.आय.सी. लिपिकाच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण वर्गात मूलभूत सुविधांचा अभाव, अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचा अभाव, संगणकाची व्यवस्था नसणे व नियमित विद्यावेतन न देणे, तसेच अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही नियमित तपासणी न करता कंत्राटदाराला संरक्षण देणे इत्यादी त्रुटी आणि गैरकारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज सोमवारी आंदोलन केले.

वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात समाज कल्याण अधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयावर प्रशिक्षणार्थी व वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी धडक देऊन संबंधित यंत्रणेला जाब विचारला. सक्षम अधिकारी गैरहजर असल्यामुळे त्यांच्या अकार्यक्षमतेचा निषेध म्हणून त्यांच्या रिकाम्या खुर्चीला शाल आणि पुष्षहार अर्पण करून तीव्र निषेध व्यक्त केला. देखरेख आणि सनियंत्रण करणाऱ्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांना चक्क नोटांचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला.

Brazil Supreme Court judge wants to investigate Elon Musk and X
एलॉन मस्क यांची ‘या’ देशात होणार चौकशी? काय आहे प्रकरण?
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका
Sudden transfer of municipal officials has affected the pre-monsoon work
महापालिका अधिकाऱ्यांच्या अचानक बदलीमुळे पावसाळ्यापूर्वीच्या कामांना फटका

हेही वाचा…‘लैगिक संबंधाचे वय १८ पण लग्नाचे वय २१ हा मोठा…’ – कोण व का म्हणतयं जाणून घ्या

अनुसूचित जातीचे शेकडो विद्यार्थी बार्टी मार्फत बँकेच्या परीक्षेची पूर्वतयारी करीत आहेत. सदर प्रशिक्षण हे एका खासगी कंत्राटदाराकडे देण्यात आले आहे. संस्थेने विद्यार्थ्यांना संगणकासह इतर मुलभूत सुविधांचा पुरवठा न केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. त्यामुळे त्यांचा सहा महिन्यांचा कालावधी हा व्यर्थ गेला आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे. सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे, महासचिव शिवदासजी कांबळे, महिला आघाडी अध्यक्ष धम्मवती वासनिक, युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी, शहराध्यक्ष कुंदन नगराळे, आकाश भगत, अश्विनी साळोडे, अंकुश सालोडे, ऋषिकेष माहुरे, आदित्य कांबळे आदी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.