scorecardresearch

मुंबई News

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.

सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.
Read More
63-year-old co-operative housing societies Unnatanagar Goregaon West undergo joint redevelopment mumbai
गोरेगावमधील ‘त्या’ सोसायट्यांना अखेर एकत्रित पुनर्विकास करावा लागणार! व्यावसायिक सदनिकाधारकांच्या स्वतंत्र पुनर्विकासाच्या प्रयत्नांना सुरुंग

तिन्ही संस्थांची सुनावणी घेऊन एकत्रित पुनर्विकासाबाबत आदेश जारी करण्याच्या सूचना म्हाडा उपाध्यक्षांनी दिल्या आहेत. 

medicines
शंभर कोटी रुपयांची औषधांची देयके थकीत; वितरकांचे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीना पत्र

पाच वर्षांपासून वितरकांची जवळपास १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक देयके खरेदी कक्षाकडून प्रलंबित आहेत.

mumbai mhada lottery server down, mhada lottery winner server down
मुंबई : म्हाडा सोडतीचा सर्व्हर डाऊन, घराचा ताबा घेण्यासाठी आलेले विजेते हैराण

सर्व्हर पूर्ववत होण्यासाठी जवळपास साडे चार ते पाच तास लागले. त्यामुळे विजेत्यांना बराच वेळ ताटकळत रहावे लागले.

BJP MLAs oppose construction houses project affected people Mulund mumbai
मुलुंडमध्ये प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधण्यास भाजपच्या लोकप्रतिनिधिंचा विरोध; अन्य धर्मीय येतील या भीतीने प्रकल्पाला विरोध

या प्रकल्पामुळे मुंलुंडमध्ये पायाभूत सुविधांवर ताण पडेल, असा आरोप या सर्व नेत्यांनी केला आहे.

Bus conductors drivers sit inside bus eat lunch boxes plight bandra canteens mumbai
VIDEO: बेस्टच्या वांद्रे आगारात उपहारगृहाअभावी वाहक आणि चालकांचे हाल; बसगाडीतच बसून जेवण करीत असल्याची चित्रफीत प्रसारित

आगाराच्या दुरुस्तीमुळे येथील उपहारगृहात बसून जेवता येत नाही, अशी तक्रार काही वाहक व चालकांनी केली आहे.

terms conditions oppressive mill workers demanding provide temporary houses mumbai
केवळ एका अटीमुळे गिरणी कामगारांवर अपात्रतेची टांगती तलवर; म्हाडाकडून घर मिळणार की नाही…

गिरणी कामगारांना सरसकट घरे देण्याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

tamilnadu man denied entry to Kohlis restaurant
“विराट कोहलीच्या रेस्टॉरंटकडून तमिळ संस्कृतीचा अपमान” लुंगी घातलेल्या तरुणाला प्रवेश नाकारला, पाहा Video

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी आता किंग कोहलीला घेरत जोरदार ट्रोल करीत आहेत;

मराठी कथा ×