scorecardresearch

संसदीय पावसाळी अधिवेशन News

भारताच्या संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session)हे २० जुलै २०२३ रोजी सुरु झाले होते. ते ११ ऑगस्ट २०२३ रोजी संपले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही घोषणा करत सर्व राजकीय पक्षांना फलदायी चर्चेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. अधिवेशनाच्या २३ दिवसांच्या कालावधीत १७ बैठका झाल्या. त्यामध्ये एकूण २१ विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहांनी केली मंजूर केली. या अधिवेशनादरम्यान लोकसभेत सुमारे ४४ टक्के तर राज्यसभेत ६३ टक्के काम झाले. अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकांची संख्या २१ आहे. यांमध्ये द सिनेमॅटोग्राफ (सुधारणा ) विधेयक २०२३, संविधान (अनुसूचित जमाती) आदेश (तृतीय दुरुस्ती) विधेयक २०२३, संविधान (अनुसूचित जमाती) आदेश (पाचवी सुधारणा) विधेयक २०२३, बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक २०२३, जैव- विविधता (सुधारणा) विधेयक २०२३, खाणी तसेच खनिजे (विकास आणि नियमन) कायदा १९५७, सागरी भागातील खनिजे (विकास आणि नियमन) सुधारणा विधेयक २०२३, वन (संवर्धन) सुधारणा विधेयक २०२३, जन्म आणि मृत्यूंची नोंदणी (सुधारणा)विधेयक २०२३ अशा विधेयकांना मंजूरी मिळाली.


पावसाळी अधिवेशनादरम्यान राहुल गांधी खासदारकी रद्द प्रकरण, मणिपूर हिंसाचार प्रकरण अशा काही गोष्टी देखील पाहायला मिळाल्या. मुळात संसदीय पावसाळी अधिवेशन हे देशाच्या हितासाठी भविष्यातील तरतुदी करण्यासाठी दरवर्षी आयोजित केले जाते. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर वाचकांना पावसाळी अधिवेशनासंबंधित सविस्तर माहिती वाचायला मिळेल.


Read More
Adhir Chowdhury
अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेचे निलंबन रद्द होण्याची शक्यता, विशेषाधिकार समितीने घेतला मोठा निर्णय!

संसदेच्या कामकाजात सातत्याने व्यत्यय आणल्याप्रकरणी त्यांच्यावर १० ऑगस्ट रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

sanjay raut shrikant shinde eknath shinde
“एकनाथ शिंदेंचे चिरंजीव दोन वेळा…”, संजय राऊतांचं श्रीकांत शिंदेंवर टीकास्र; म्हणाले, “हेच लोक…!”

संजय राऊत म्हणतात, “२०२४ च्या विजयासाठी मोदी-शहांना दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतात व भ्रष्टाचाऱ्यांची मोट बांधून त्यांची वारेमाप स्तुती करावी लागते.…

Raghav Chadha changes Twitter bio
खासदारकी रद्द होताच राघव चड्ढा यांनी ट्विटवरील बायोत केला बदल, वाचा काय लिहिलं

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. आता त्यांनी आपल्या ट्विटवरील बायोत बदल केला आहे…

Raghav Chadha suspended
Raghav Chadha Suspended : आप खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित, बनावट सह्यांच्या प्रकरणात कारवाई

बनावट सह्यांच्या प्रकरणात आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्यावर राज्यसभेने निलंबनाची कारवाई केली आहे.

Adhir Ranjan Chowdhury
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी लोकसभेतून निलंबित, पंतप्रधानांबद्दलचं ‘ते’ वक्तव्य भोवलं

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांच्यावरील कारवाईसाठीचा ठराव सभागृहात मांडला.

pm narendra modi (2)
VIDEO: “मोदींच्या भाषणातून टिप्पणी आणि विनोद ऐकायला मिळाले”, मणिपूर प्रश्नावरून आरजेडीच्या खासदारांची जोरदार टीका

अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावर आरजेडीच्या खासदाराने जोरदार टीका केली आहे.

PM Modi breaks silence on Manipur violence in lok sabha
मणिपूरवरून मोदी व शहा यांची बचावात्मक भूमिका; हिंसाचाराचे खापर फोडले काँग्रेसवर

मणिपूर, मिझोराम किंवा अन्य ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचाराला मोदी यांनी काँग्रेसला जबाबदार धरले.