गेले तीन महिने मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार आटोक्यात आणण्यात केंद्र व राज्यातील भाजप सरकारला अजूनही यश आले नसले तरी तरी या हिंसाचाराचे सारे खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर फोडले आहे. मणिपूर मुद्द्यावर मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांनाही नेहमीची आक्रमक भूमिका सोडून लोकसभेत काहीशी बचावात्मक भूमिका घ्यावी लागली आहे.

हेही वाचा >>> बिहारमध्ये भाजपाची नवी कार्यकारिणी, तरुण नेत्यांना संधी; जातीय, प्रादेशिक समतोल साधाण्याचा प्रयत्न!

BJP tension rises in Karnataka Lingayat saints
कर्नाटकात भाजपाचे टेन्शन वाढले; मोदी सरकारमधील मंत्र्यांविरोधात लिंगायत संत लढणार
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप

मणिपूर हिंसाचारावरून लोकसभेत काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेला पंतप्रधान मोदी यांनी सुमारे दोन तासांपेक्षा अधिक काळ उत्तर दिले. तर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन तास उत्तर दिले होते. देशातील कोणत्याही प्रश्नावर मोदी किंवा शहा आक्रमकपणे उत्तरे देतात, असा आजवरचा अनुभव असला तरी मणिपूरवर मोदी किंवा शहा यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. तसेच मोदी यांनी हिंसाचाराचे सारे खापर काँग्रेसवर फोडले. तसेच न्यायालयीन कामकाजाबद्दल मोदी यांनी टिप्पणी केली.

मणिपूर, मिझोराम किंवा अन्य ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचाराला मोदी यांनी काँग्रेसला जबाबदार धरले. मणिपूर गेली तीन महिने धुमसत आहे. हिंसाचार आटोक्यात आणण्यात अजूनही केंद्र व राज्य सरकारला पूर्णपणे यश आलेले नाही. अमित शहा यांनी आपल्या भाषणात राज्यापुढील प्रश्न व त्यावर केंद्र सरकार करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल सविस्तर उत्तर दिले होते. भाषणाच्या शेवटी मोदी वा शहा यांना नेहमीचा आक्रमकपणा सोडून शांततेसाठी आवाहन करावे लागले. अमित शहा यांनी तर हात जोडून साऱ्यांनी शांततेसाठी प्रयत्न करावेत, असे लोकसभेत आवाहन केले होते.

हेही वाचा >>> ओबीसी आरक्षणात वाढ करून राजकीय पकड अधिक घट्ट करण्यावर राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांचा भर

मोदी सरकारच्या विरोधातील अ‌विश्वाचा प्रस्ताव हा मणिपूरच्या हिंसाचारावरून होता. पण चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी दीड तास तासांच्या भाषणानंतर मणिपूरचा उल्लेख केला. आधी बहुतांशी वेळ काँग्रेस व इंडियावर टीका करण्यातच गेला. मणिपूरवरून उत्तर द्या, अशी घोषा विरोधी बाकांवरून सातत्याने लावण्यात आला होता. पण मोदी काही प्रतिसाद देत नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. तेव्हा मोदी यांनी मणिपूरचा विषयाला हात घातला. सुरुवातीला मर्यादित स्वरुपात उल्लेख केला होता. पण भाषणाच्या शेवटी मोदी यांनी परत मणिपूरवरून भाष्य केले. ‘इंडिया’ आघाडीचा उल्लेख मोदी यांनी अहंकारी आघाडी असाच सातत्याने केला. काँग्रेस व गांधी घराण्यावर यथेच्छ टीका केली. २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येणारच असा ठाम विश्वास व्यक्त करताना २०२८ मध्ये पुन्हा अविश्वासाचा ठराव दाखल करावा, असे आव्हानच विरोधकांना मोदी यांनी दिले.