News Flash

अतिथी  विश्लेषण : संपत्ती निर्मितीची २०१७ ची दशसूत्रे

एकदा का तुमचे ध्येयनिश्च्ती झाली की ते पूर्ण करण्यासाठी नियमितपणे किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे ते ठरवा.

प्रातिनिधिक छायाचित्र

२०१७ मध्ये प्रत्येकाने करायला हव्यात, अशा या काही १० गोष्टी आहेत. याआधी त्या केल्या नसतील तर बचत, गुंतवणूक, संरक्षण या वित्तीय योजनेला चालना द्याल, याची स्वत:ला खात्री द्या 

१. डिसेंबर २०१७ पर्यंत तुमच्या सर्व मालमत्तेसह, तुमचे काही संपत्तीचे ध्येय असेल तर ते मांडा.

एकदा का तुमचे ध्येयनिश्च्ती झाली की ते पूर्ण करण्यासाठी नियमितपणे किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे ते ठरवा. घरासाठीचे बयाणा देणे यासारख्या त्यातल्या त्यात जवळच्या ध्येयासाठी महत्त्वाचे म्हणजे, गुंतवणूक आणि रोकड सुलभता हवी आणि परताव्यांशी फारकत घेणारी नसावी. असे असले तरीही, संपत्ती निर्मितीच्या अनेक वर्षांच्या ध्येयासाठी प्रत्येकाने पारंपरिक समभाग साधनांध्ये गुंतवणूक करायला हवी,

२. झेपेल इतकाच खर्च करा. महिन्याला एकूण ३० टक्कय़ांखाली खर्च असू द्या.

ध्येय मांडून ठेवायला हवे आणि किराणा माल, मुलांचे शिक्षण, वाहतूक इत्यादींसारख्या (घराखेरीज) गरजेच्या गोष्टींचा खर्च तुमच्या करमणूक आणि इतर मुख्यतारीच्या गोष्टींआधी मांडून ठेवायला हव्यात.

३. मासिक उत्पन्नातील ३० टक्के रक्कम एसआयपींच्या इक्विटी म्युच्युअल फंडात टाका.

अनेक कुटुंबांचा एकूण उत्पन्नातील ७० टक्के खर्च हा भाडय़ाच्या किंवा तारण कर्जावरील घरांमध्ये आणि नियमित खर्चांमध्ये येतो. उर्वरीत ३० टक्के रक्कम मात्र दीर्घकाळच्या चांगल्या कामगिरीच्या इक्विटी म्युच्युअल फंडांत गुंतवणे गरजेचे आहे. म्युच्युअल फंडांचे दीर्घकालीन १२-१६ टक्के करमुक्त परतावे मिळतात.

४. जास्त व्याज असलेले वैयक्तिक कर्ज आणि देणी तातडीने संपवा.

व्याजदर असलेले वैयक्तिक कर्ज वर्षांला २० टक्कय़ांएवढी जास्त रक्कम घेते, अशा कर्जांची जबाबदारी असणे म्हणजे बचतीला  मोठी गळती असण्यासारखेच आहे. वैयक्तिक कर्ज घेणे शक्यतो टाळा.

५. वार्षिक उत्पन्नाच्या ५-१० पट टर्म प्लॅनची ऑनलाइन खरेदी (कमीत कमी १ कोटी रुपये) करा.

तुम्ही कुटुंबाचे कर्ते असाल, तर कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते. आजच्या काळात तुमचे आयुष्य परवडणाऱ्या किंमतीच्या टर्म प्लॅनने सुरक्षित करणे आवश्यक आहे. आणि यात चालढकल करण्याची कुठलीही कारणे शोधू नका. तुमचे कुटुंब सुरक्षित आहे याची खूणगाठ मनाशी बांधल्यावरच तुम्हाला नक्कीच सुखाची झोप लागू शकेल!

६. कुटुंबाला साजेसा बदलता वैद्यकीय विमा प्लॅन खरेदी करा. खास करून आई-वडिल आणि सासू-सासरे यांच्यासाठी.

कुटुंबासाठी चांगला वैद्यकीय विमा नसल्याने तुमची आखीव-रेखीव बचत एखाद्या आजारपणात मोडीत काढावी लागली तर त्याचा काय फायदा. आजच्या घडीला वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च बघता, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी तुम्ही साधारणपणे ३-५ लाख रुपयांचे वैद्यकीय सुरक्षा कवच, अतिरिक्त खर्चासाठीच्या टॉप अप कव्हरसह घ्या.

तुमच्या कुटुंबासाठीच्या वैद्यकीय विम्याचा प्रीमियम वर्षांला २५,००० रुपयांपर्यंत जाईल आणि आई-वडिलांसाठी घेतलेल्या आरोग्य विम्याच्या ३०,००० रुपयांपर्यंतच्या हप्त्यावर प्राप्तीकर कलम ८० डी अंतर्गत वजावट मिळवू शकता.

७. गंभीर आजारांची पॉलिसी खरेदी करा.

या प्रकारच्या विम्यात विमाधारकास गंभीर आजार उद्भवल्यास एक ठरावीक रक्कम विमा कंपनी देऊ  करते. या गंभीर आजारांच्या उपचारांचा खर्चही मोठा असल्याने उपचारांसंबंधीच्या खर्चाची काळजी यात घेतली जाते आणि या काळातल्या बुडालेल्या वेतनाचीही भरपाई केली जाते.

८. मालमत्तेचे वाटप योग्य वैविध्य असणे गरजेचे.

तुमच्या पोर्टफोलिओत मालमत्तेचे, समभाग रोखे आणि पर्यायी मालमत्ता (जमीन जुमला सोने इत्यादींसारखी) अशा प्रमाणात करा. योग्य मालमत्तेच्या विभाजनासाठी तुमच्या गरजांचा विचार होणे गरजेचे आहे. मालमत्तेचे योग्य विभाजन होणे हा गुंतवणुकीच्या धोरणाच्या यशाचा मुलभूत घटक आहे,

९. विविध कराच्या योजना तातडीने बनवायला लागा.

प्रत्येक वर्षी मार्च महिन्यापर्यंत ही बाब मागेच ढकलली जाते. ही अशी एक बाब आहे जी की तुम्ही सतत वर्षभर केली पाहिजे. इएलएसएस आणि पीपीएफ अशा पद्धतींनी १.५० लाख रुपयांपर्यंत रक्कम तयार करा आणि कलम ८० सी च्या वजावटीचा फायदा घेण्यासाठी एनपीएसअंतर्गत अतिरिक्त ५०,००० रुपयांची रक्कम गुंतवा.

१०.  नसेल तर यावर्षी तुमचे मृत्यूपत्र नक्की लिहून काढा.

आपण आयुष्याची २०, ३० आणि ४० वर्षे पैसे कमावण्यात घालवतो. या कालावधीत आपण घरखरेदी करतो, स्वत:चा व्यवसाय सुरू करतो, भांडवली बाजारात पैसे गुंतवतो, जीवन विमा खरेदी करतो. तुमची मालमत्ता काहीही असो ते आपल्या प्रियजनांपर्यंत आणि कुटुंबियांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. हे आयुष्यातील आनंददायी काम नसले तरी  महत्वाचे नक्कीच आहे.

 

अभिजित भावे

मुख्य कार्यकारी अधिकारी, (भारत व मध्यपूर्व आशिया)  काव्‍‌र्ही प्रायव्हेट वेल्थ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 1:10 am

Web Title: expert financial planning tips for 2017
Next Stories
1 गाजराची पुंगी : ‘ती’ सध्या काय करते?
2 माझा पोर्टफोलियो : भाव जास्त; पण महाग नव्हे!
3 ‘डी-स्ट्रीट’चे मर्म.. : विकासासाठी कटिबद्ध सरकारचे वीजनिर्मितीकडे दुर्लक्ष कसे होईल?
Just Now!
X