अवंथा समूहाची कंपनी असलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हजने नाशिक येथील स्विचगिअर कॉम्प्लेक्समध्ये १,६०० केव्ही अल्ट्रा हाय व्होल्टेज संशोधन केंद्राचे नुकतेच उद्घाटन केले. कंपनीने संशोधन आणि विकासाच्या  क्षमता वाढविण्यासाठी ४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीचे हे नवे संशोधन केंद्र २१,७८६चौरस फूट क्षेत्रफळावर ११८ फूट उंच आहे.यात चाचण्यांसाठी उच्च दर्जाचे उपकरणेही बसविली आहे. ७६५ केव्ही क्षमतेपर्यंतची उर्जा उत्पादने तयार करण्यात कंपनी या क्षेत्रात आघाडीवर असून, अल्ट्रा हाय व्होल्टेज क्षेत्रात लागणाऱ्या उत्पादनांची निर्मिती कंपनीद्वारे केली जाते. उच्च शक्तीचे डिस्कनेक्टर कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यावर या संशोधन आणि विकास केंद्राचा भर असेल. या केंद्रात १,६०० केव्ही एसी आणि ३,६०० केव्ही, ३६० केजे क्षमतेची चाचणी क्षमता असलेले उपकरणे असतील. त्याद्वारे जागतिक दर्जाच्या उत्पादनांची चाचणी केली जाईल. अवंथा समूहाच्या या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक लॉरेंट डेमोर्टअिर म्हणाले की, हे केंद्र एक मलाचा दगड आहे. जलद गतीने वृद्धींगत होणाऱ्या यूएचव्ही/ईएचव्ही उत्पादनांच्या बाजार स्पध्रेत टिकता यावे यासाठी हे केंद्र फायद्याचे ठरणार आहे. नाशिकमधील हे केंद्र जगभरातील ग्राहकांना एमव्ही (मिडियम व्होल्टेल) आणि एचव्ही (हाय व्होल्टेज) स्विचगिअर पुरवेल. नवीन केंद्रामुळे ईएचव्ही व यूएचव्ही क्षमतेची १,२०० केव्हीची स्विचगिअर पुरवता येतील.
ग्रीव्ह्जतर्फे समकालीन ऑक्झिलिअरी पॉवर उत्पादने
ग्रीव्ह्ज कॉटन या आघाडीच्या इंजिनीअरिंग कंपनीचा भाग असलेल्या ग्रीव्ह्ज ऑक्झिलिअरी पॉवर बिझनेसने नव्या एमिशन नियमांची पूर्तता करणारे, तसेच इंधनक्षम, स्मार्ट डिझाइन असलेले ऑक्झिलिअरी पॉवर सोल्यूशन दाखल केले आहे. ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेडचे अध्यक्ष करण थापर यांनी बेंगळुरूतील शेरेटन येछे नव्या उत्पादनांचे अनावरण केले. आव्हानात्मक स्थितीमध्ये अखंडित ऑक्झिलिअरी पॉवर देण्याच्या दृष्टीने डिझाइन केलेली तीन नवी उत्पादने सब २० केव्हीए; १६०-२५० केव्हीए  आणि हायर एंड ५०० केव्हीए सीपीसीबी २ रेड जेनसेस्ट व इंजिन सेग्मेंट्स यांसाठी आहेत. ग्रीव्ह्ज इंजिनाचे उत्पादन करून व कॅनोपॉइज्ड जेनसेट पुरवून एकाच छताखाली सर्व सेवा देते.