13 August 2020

News Flash

यशस्वी गुंतवणुकीची सुलभ तत्त्वे

आपल्या भोवतालचे जग सतत बदलत असते आणि त्या बदलांचा कोणताच अंदाज बांधता येत नाही. त्याचप्रमाणे भांडवली बाजाराचाही अंदाज बांधता येत नाही.

| May 7, 2015 06:26 am

आपल्या भोवतालचे जग सतत बदलत असते आणि त्या बदलांचा कोणताच अंदाज बांधता येत नाही. त्याचप्रमाणे भांडवली बाजाराचाही अंदाज बांधता येत नाही. मग अशा माध्यमात गुंतवणूक करण्यात काय हशील ज्याची निष्पत्ती अनिश्चित आहे?
आपल्या आíथक यशावर ज्या घटकांचा प्रभाव पडू शकतो अशा काही घटकांचा हा आढावा :

गुंतवणुकीला किती वेळ देता हे महत्त्वाचे
अनेकदा आपण म्हणतो, त्यावेळीच गुंतवणूक करायला हवी होती किंवा बाजार तेजीत होता तेव्हाच मी सारे विकून टाकायला हवे होते. खरे तर काळ चांगला होता की वाईट हे आपल्याला वेळ गेल्यानंतरच उमगते.
उदाहरणार्थ – काही वर्षांपूर्वी जेव्हा बीएसई सेन्सेक्स ३,३०० होता तेव्हा ज्या गुंतवणूकदारांनी असा विचार केला की आता बाजाराने तळ गाठला आहे ते सप्टेंबर २००१ मध्ये अचंबित झाले. कारण तेव्हा सेन्सेक्स आणखी ७०० अंशांनी खाली उतरला. मग ऑगस्ट २००३ मध्ये हाच निर्देशांक ३,३०० वरून ४,००० अंश वर आला. तेव्हा बाजाराने चांगलीच उसळी घेतली म्हणून दूर राहिलेल्या गुंतवणूकदारांना आणखी ५०० अंशांना मुकावे लागले.
शेअर बाजाराच्या ‘वेळे’शी यशस्वीरित्या जुळवून घेणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय हे बाजाराच्या स्थितीपेक्षा गुंतवणुकीच्या स्थितीच्या काळजीपूर्वक विश्लेषणावर बेतलेले असावेत.
एक महत्त्वाची गोष्ट आपण नेहमीच ध्यानात ठेवली पाहिजे. ती म्हणजे अल्पकालीन अस्थिरता ही नेहमीच दीर्घकालीन टप्प्यापेक्षा लवकर ठीकठाक होते.

विजेत्यांचे सतत परिवलन होत असते
गुंतवणुकीचा एक महत्त्वपूर्ण नियम म्हणजे विविधता राखणे. यामुळे जोखीम कमी होते कारण वेगवेगळ्या गुंतवणुकीचे चढ-उतार परस्परभिन्न असतात. कोणत्याही गुंतवणुकीतून जोखीम पूर्णत: काढून टाकता येत नाही. मात्र तिला रोखण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे गुंतवणुकीतली विविधता. त्यामुळे गुंतवणुकीचा निर्णय घेताना गुंतवणुकीचा नेमका पर्याय निवडता आला पाहिजे. कोणी ‘लार्ज कॅप’मध्ये गुंतवणूक करू शकतो तर कोणी ‘मिड कॅप’ समभागांमध्ये किंवा एकाच क्षेत्रात गुंतवणूक करता येते आणि निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करता रेते. शिवाय कंपनी अथवा सार्वजनिक कंन्यांचे रोखे, सरकारी समभाग, बदलता दर असणारी साधने अशी विविध माध्यमे आहेत.

नियमितपणे गुंतवणूक करा
* भविष्यासाठी तरतूद करायला अजून माझ्याकडे बराच वेळ आहे.
* माझ्याकडे गुंतवणुकीसाठी पुरेसा पैसा नाही.
* पैसा कमावण्यातच इतका गर्क झालोय की त्याचे नियोजन कसे करावे याची मला चिंताच नाही.
हे सर्व विचार चुकीचेच आहेत. जितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल तितके चांगले. जेवढे अधिक कालावधीसाठी पसे गुंतून राहतील किंवा जितका जास्त वेळ बचत कराल तितके जास्त पसे तुम्ही कमवाल.
गुंतवणुकीचे नियम सतत सांगितले जात असले तरी वेळोवेळी त्यांचा पुनर्वचिार केल्यास गुंतवणुकीतले ‘यश’ आणि ‘अपयश’ यातली तफावत शोधण्यासाठी आवश्यक असणारी दृष्टी आपल्याला मिळू शकते. आपण गुंतवणुकीला कधी सुरुवात करतो हे महत्त्वाचे असते. जितक्या लवकर त्यासाठी सुरुवात कराल तितके त्याचे भविष्यात फायदे जास्त मिळवाल!

 

दिनकर आणि प्रतिभा यांचेच उदाहरण घेऊ या. दोघांचेही वय ६० वर्षे आहे.
प्रतिभा यांनी वयाच्या पंचविशीतच पसे साठवायला सुरुवात केली. त्यांनी दरवर्षी १०,००० असे सलग १० वर्षे पसे साठवले ज्यावर त्यांना वार्षकि १५ टक्के व्याज मिळाले. यानंतर पसे साठवणे त्यांनी बंद केले. तरी त्यांना वार्षिक १५ टक्के दराने व्याज मिळतच राहिले. जेव्हा त्यांनी वयाची साठी गाठली तेव्हा त्यांच्या एक लाख रुपयांचे ७६.९० लाख रुपये झाले. होते.
दिनकर पस्तिशीला येईपर्यंत गुंतवणूक करणे टाळत राहिले. त्यानंतर त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत दरवर्षी १०,००० अशी गुंतवणूक केली. अखेरीस त्यांची २.५ लाखांची गुंतवणूक केवळ २४.६० लाख रुपयांपर्यंतच वाढली.
वरच्या उदाहरणातून असे दिसते की, प्रतिभा यांनी दिनकर यांच्यापेक्षा १५ वर्षांनी आणि १.५ लाखांनी कमी गुंतवणूक केली असली तरी प्रतिभा यांनी दिनकर यांच्यापेक्षा ५२.३० लाख रुपये जास्त कमावले. यामागचे एकमेव कारण म्हणजे प्रतिभा यांनी रोहितपेक्षा १० वर्षे आधीपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती.

लेखक फ्रँकलिन इक्विटीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2015 6:26 am

Web Title: how to make better investments
टॅग Business News
Next Stories
1 सलमान खानच्या निकालानंतर बाजार घायाळ!
2 स्पर्धा आयोगाकडून ‘फ्लिपकार्ट’ निर्दोष
3 ‘निव्हिया’ही गुजरातमध्ये; साणंदमध्ये पहिला प्रकल्प
Just Now!
X