भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक नव्या सप्ताहारंभीही कायम राहिली. सेन्सेक्ससह निफ्टी त्यांच्या आठवडय़ाच्या पहिल्या सत्रातील वरच्या टप्प्यापासून दिवसअखेर माघारी फिरले. रिझव्‍‌र्ह बँके ने व्यक्त केलेल्या वाढत्या थकीत कर्जाबाबतची चिंता बँक समभागांच्या विक्रीमाऱ्याने स्पष्टपणे दिसून आली.

शुक्रवारच्या तुलनेत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९४.१७ अंश घसरणीसह ३७,९३४.७३ पर्यंत खाली आला, तर सत्रातील वरच्या टप्प्यापासून मुंबई निर्देशांक दिवसअखेर ५०० अंशाने खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६२.३५ अंश घसरण होऊन निर्देशांक ११,१३१.८० वर स्थिरावला.