‘इंडिया फार्मा वीक’मधून सामथ्र्य-आव्हानांची उजळणी; डिसेंबरमध्ये सप्ताहभर कार्यक्रम

मुंबई :  जागतिक औषध उत्पादनात ३.१ ते ३.६ टक्के इतके मूल्यात्मक योगदान असलेल्या भारतीय औषधी उद्योगाने २०२५ सालापर्यंत १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठणे अपेक्षित आहे. औषधउत्पादन व्यवसायातील प्रवाह, ज्ञान, नेतृत्व, नवकल्पना, मान्यता आणि आदानप्रदानाला भर असणाऱ्या ‘इंडिया फार्मा वीक’ या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या सप्ताहाभराच्या कार्यक्रमातून औषधी क्षेत्रातील आपल्या सामथ्र्य आणि आव्हानांचा वेध घेतला जाणार आहे.

दिल्लीनजीक ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्टमध्ये १० ते १४ डिसेंबर २०१८ असे आठवडाभर नवीन प्रयोगशील कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यूबीएम इंडियाने या बहुप्रतीक्षित इंडिया फार्मा वीकच्या या तिसरी आवृत्तीचे आयोजक या नात्याने औषध उद्योगातील सर्व भागीदारांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी सज्जता केली आहे.

एप्रिल २००० ते डिसेंबर २०१७ या काळात १५.५९ अब्ज डॉलर्स मूल्याची एकत्रित थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. तर जगातील २००हून अधिक देशांमध्ये भारतात उत्पादन झालेली औषधे निर्यात होतात. अमेरिका ही भारतीय औषधांची प्रमुख बाजारपेठ आहे. जागतिक निर्यातीमध्ये २० टक्के योगदान जेनेरिक औषधांचे असून यामुळे भारत जगाच्या दृष्टीने जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठादार आहे.

दक्षिण आशियातील सर्वात मोठे औषध उत्पादन प्रदर्शन या नात्याने इंडिया फार्मा वीकमधून भारताच्या औषध उत्पादन भरारीला आणखी चालना मिळणे अपेक्षित आहे.