बँक ऑफ इंडियाने त्यांच्या आयएमटीची सुविध असलेल्या एटीएमसेंटरमधून ‘कार्डलेस कॅश व्रिडॉवल’ची सुविधा देणारी आयएमटी अर्थात ‘इन्स्टंट मनी ट्रान्सफर’ सेवा सुरू करत असल्याची घोषणा केली. कोणत्याही सार्वजनिक बँकेने ही सेवा सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपल्याला ज्याला पसे पाठवायचे आहेत त्याचा केवळ मोबाइल क्रमांक मिळवून त्यावर बँकेच्या एटिएम आणि रिटेल इंटरनेट बँकिंगच्या सुविधेच्या माध्यमातून पसे पाठवता येतात. ज्याला आपण पसे पाठवले त्याला ‘बँक ऑफ इंडिया’च्या एटीएममधून कार्डाशिवाय पसे मिळतात. ज्याला पसे पाठवले त्याला पसे काढण्यासाठी त्याच्या मोबाइलवर काही माहिती पाठविली (कोड) जाते तर काही माहिती ज्याने पसे पाठवले तो देतो.
‘निर्माण संस्थे’चे संचालक आणि मुंबई विद्यापीठाच्या निर्मला निकेतन या सामाजिक कार्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. वैजयंता आनंद यांच्या उपस्थितीत बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा व्ही. आर. अय्यर यांनी या सेवेचे उद्घाटन केले. अय्यर म्हणाल्या की, ग्राहकांसाठी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारी सरकारी मालकीच्या बँकांमधील ही पहिली बँक आहे. केंद्र सरकारच्या वित्तीय सर्वसमावेशकतेच्या वृद्धीचे उद्दिष्टही यातून साध्य होते, असेही त्या म्हणाल्या.