देशातील आघाडीच्या मारुती सुझुकीचे दुसऱ्या मॉडेलने २५ लाख विक्रीचा टप्पा पार केला आहे. २००० मध्ये अस्तित्वात आलेल्या अल्टोने २५ लाख विक्री नोंदविली आहे. यापूर्वी कंपनीची पहिली कार मारुती ८०० ने हा क्रम राखला होता.
कंपनीचा हा विक्री टप्पा देशांतर्गत बाजारपेठेतील आहे. कंपनीने निर्यात केलेल्या अल्टोची संख्या २.८५ लाख आहे. आठ विविध प्रकारात असलेल्या अल्टोची किंमत २.४१ लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने अल्टो हे मॉडेल सर्वप्रथम सप्टेंबर २००० मध्ये सादर केले होते.
कंपनीने मारुती ८०० ची निर्मिती जानेवारी २०१४ मध्ये थांबविली. दरम्यान कंपनीने अल्टो १,००० सीसीमधील तसेच ऑगस्ट २०१० मध्ये के१० ही कार सादर  केली होती. के१० सिरिजच्या ४ लाख अल्टो कंपनीने विकल्या आहेत. तर ऑक्टोबर २०१२ मध्ये सादर झालेल्या अल्टो ८०० नेही एक लाखाचा टप्पा सर केला आहे.
कोणत्याही एका वाहन प्रकाराने २५ लाख वाहन विक्री नोंदविणे हे मारुतीच्या रुपात भारतीय वाहन क्षेत्रात प्रथमच घडले आहे.