आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने याचे परिणाम भारतातही पहायला मिळत आहे. शनिवारी मुंबईत पेट्रोल प्रति लिटर १७ पैसे तर डिझेल प्रति लिटर २० पैशांनी महागले आहे. मुंबईत शनिवारी पेट्रोलसाठी प्रति लिटर ७६. ३५ रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर ६८. २२ रुपये मोजावे लागतील.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या १० दिवसांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली आहे. गेल्या दिवसांमध्ये मुंबईत पेट्रोल प्रति लिटर २. १९ रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर ३. १० पैशांनी महागले आहे.
मुंबईत शनिवारी पेट्रोलसाठी वाहनचालकांना प्रति लिटर ७६. ३५ रुपये आणि डिझेलसाठी प्रति लिटर ६८. २२ रुपये मोजावे लागतील. दिल्लीतही शनिवारी पेट्रोलचे दर १७ पैसे आणि डिझेलचे दर १९ पैशांनी वाढले. दिल्लीत पेट्रोलसाठी प्रति लिटर ७० रुपये ७२ पैसे आणि डिझेलसाठी प्रति लिटर ६५ रुपये १६ पैसे मोजावे लागतील. ९ जानेवारीपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील दर (प्रति लिटर नुसार)

> औरंगाबाद<br />पेट्रोल – ७६. २३ रुपये
डिझेल – ६७. ०४ रुपये

> नाशिक
पेट्रोल – ७६. ८५ रुपये
डिझेल – ६७. ६४ पैसे

> नागपूर<br />पेट्रोल – ७६. ८४ रुपये
डिझेल – ६८. ७५ रुपये

> पुणे<br />पेट्रोल – ७६. २३ रुपये
डिझेल – ६७. ०४ रुपये