गेल्या काही दिवसांपासून पैशा-पैशांमध्ये सुरु असलेली पेट्रोलच्या दरातील वाढ आता उच्चाकांवर पोहोचली आहे. पेट्रोलच्या दराने वर्षभरातील उच्चाकी पातळी गाठली आहे. पेट्रोलच्या दरात ९ पैसे वाढ झाली असून, डिझेल २६ पैशांनी महागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पैशा-पैशांमध्ये सुरु असलेली पेट्रोलच्या दरातील वाढ आता उच्चाकांवर पोहोचली आहे. पेट्रोलच्या दराने वर्षभरातील उच्चाकी पातळी गाठली आहे. पेट्रोलच्या दरात ९ पैसे वाढ झाली असून, डिझेल २६ पैशांनी महागले आहे. रविवारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी इंधनदरात कोणतीही वाढ केली नव्हती. सोमवारी मात्र यात वाढ करण्यात आली आहे.

मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लीटर ८० रूपये ६५ पैशांवर पोहोचला आहे तर डिझेल ६९ रूपये २७ पैसे प्रति लीटर या दराने विकले जात आहे. दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूच्या तुलनेत मुंबईकरांना पेट्रोलसाठी सर्वाधिक फटका बसत आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ७५ रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर ६६.०४ रूपयांवर आहे.

वरील चारही शहरांची तुलना केल्यास दिल्लीकरांना पेट्रोल आणि डिझेल स्वस्तात मिळत आहे. कारण येथे कर कमी आकारला जात आहे. सौदी अरेबियाने तेल उत्पादनात घट करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर इंधन दर वाढणे अपेक्षित होते. कारण, त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीही वाढण्यास सुरूवात झाली होती. कच्च्या तेलाचे भाव तीन महिन्यांच्या उच्चांकावर आहेत.

चार शहरांतील इंधनाचे दर 
(०९/१२/१९)
मुंबई – पेट्रोल ८०.६५ रू./लीटर   | डिझेल – ६९.२७ रू./लीटर
दिल्ली – पेट्रोल ७५.०० रू./लीटर  | डिझेल – ६६.०४ रू./लीटर
बंगळुरू – पेट्रोल ७७.५७  रू./लीटर  | डिझेल – ६८.२९  रू./लीटर
हैदराबाद  – पेट्रोल ७९.८१  रू./लीटर  | डिझेल – ७२.०७  रू./लीटर