News Flash

सेन्सेक्स तीन सप्ताहांच्या उच्चांकावर

तेजीसह प्रवास करणाऱ्या अमेरिकेच्या आर्थिक विकासाच्या आकडय़ावर खूश

तेजीसह प्रवास करणाऱ्या अमेरिकेच्या आर्थिक विकासाच्या आकडय़ावर खूश होत गुंतवणूकदारांनी बुधवारी सेन्सेक्सला त्याच्या गेल्या तीन आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यावर नेऊन ठेवले. एकाच व्यवहारातील २५९.६५ अंश वाढीमुळे मुंबई निर्देशांक दिवसअखेर २५,८५०.३० वर पोहोचला. तर ७९.८५ अंश भर घातल्यामुळे निफ्टीला त्याचा ७,८०० चा टप्पा ७,८६५.९५ पर्यंत नेता आला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी एक टक्क्याहून अधिक वाढ नोंदविली. अमेरिकेचे २०१५ मधील तिसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाचे आकडे तेजीचे नोंदले गेले. त्याचबरोबर भारताच्या चालू खात्यावरील तुटीचे प्रमाणही कमी झाल्यामुळे बाजारात गुंतवणूकदारांनी बुधवारी खरेदीचा सपाटा लावला. डॉलरच्या तुलनेत रुपया सलग सातव्या व्यवहारात उंचावल्याचेही बाजारात स्वागत झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 8:03 am

Web Title: sensex three weeks of high
Next Stories
1 मूलभूत इंटरनेट मोफत सेवा थांबवा : रिलायन्स कम्युनिकेशन्सला ‘ट्राय’चा आदेश
2 निर्गमनाच्या वाटेवरील एस्सार ऑइलचे समभागमूल्य वर्षभरात दुप्पट
3 ‘पीएससीएल’च्या दाव्यांची प्रक्रिया सुरू
Just Now!
X