News Flash

व्यापार संक्षिप्त : मुंबई: ऑनलाइन देणग्या, लाइव्ह आरती,

घरबसल्या बाप्पांच्या दर्शनाची भक्तांना सोय वगैरे नामांकित गणेशोत्सव मंडळांनाच शक्य आहे, परंतु छोटी मंडळे आणि अगदी घरगुती गणपतींनाही वेबविश्वात आपली खास जागा मिळविता येणे शक्य

| August 29, 2014 01:01 am

घरबसल्या बाप्पांच्या दर्शनाची भक्तांना सोय वगैरे नामांकित गणेशोत्सव मंडळांनाच शक्य आहे, परंतु छोटी मंडळे आणि अगदी घरगुती गणपतींनाही वेबविश्वात आपली खास जागा मिळविता येणे शक्य बनले आहे. गणेशाचे आगमन होत असताना सुरू झालेल्या ‘गणपतीमंडळ डॉट कॉम’ (Ganpatimandal.com) ने ही सोय केली आहे. फॅशन, मनोरंजन आणि आरोग्यनिगा क्षेत्रासाठी उपाययोजना पुरविणाऱ्या ओएमसीव्ही सव्‍‌र्हिसेसद्वारे हे संकेतस्थळ सुरू केले असून, अल्पशा मोबदल्यात घरगुती गणपतींनाही सायबरविश्वाशी संलग्नता मिळविता येईल.
रिको इंडियाचे पुण्यात ‘३६० डिग्री’ अनुभूती केंद्र  
मुंबई: माहिती-तंत्रज्ञान व कार्यालयांच्या स्वचलित यांत्रिकीकरणातील अग्रेसर नाव असलेल्या रिको इंडियाने ‘३६० डिग्री एक्स्पिरियन्स’ हे आपल्या उत्पादनांची परिपूर्ण माहिती देणारे अनुभूती केंद्र पुण्यात सुरू केले आहे. आपली मुख्य कार्यक्षेत्रे असलेल्या प्रिंटिंग व इमेजिंग, डॉक्युमेंट मॅनेजमेंट, आयटी सव्‍‌र्हिसेस व कम्युनिकेशन सिस्टीम्स यातील सखोल अनुभव व ज्ञानाने समृद्ध संपूर्ण उत्पादन श्रेणी रिकोने या निमित्ताने संभाव्य ग्राहकांना अनुभवण्यासाठी प्रस्तुत केली आहे. निर्मिती क्षेत्र तसेच व्यावसायिक शिक्षणांचे प्रमुख केंद्र  असलेले पुणे ही कंपनीसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे.
‘किलरेस्कर’ आता कृषिपयोगी यंत्रांच्या निर्मितीत
मुंबई : भारतात कृषी यांत्रिकीकरण आजही अपरिपक्व अवस्थेत असले तरी शेतीसाठी वीज आणि इंधनाची उपलब्धता वाढत आहे तसतसे शेतीसाठी आधुनिक पद्धतींचा वापरही वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर शेतीसाठी डिझेल पंप संचाच्या निर्मितीतील अग्रेसर किलरेस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने शेतीसाठी उपयुक्त  यंत्रसामग्रीच्या निर्मितीचीही योजना आखली आहे. कंपनीचे उपाध्यक्ष अँटोनी चेरूकारा यांनी उत्कृष्ट  दर्जाची कृषी यांत्रिकीकरण उत्पादनांची शृंखला दाखल होत असून, शेतकऱ्यांच्या वाढत्या गरजा पूर्ण करणे आणि शेतीला आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य बनविणे, असा दुहेरी हेतू नजरेसमोर असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:01 am

Web Title: short business news 2
टॅग : Business News
Next Stories
1 बाजाराला युरो झोन चालना
2 लागार्डही फ्रान्समध्ये चौकशीच्या फेऱ्यात
3 ‘स्नॅपडील’मध्ये रतन टाटांची गुंतवणूक
Just Now!
X