10 August 2020

News Flash

आगेकूच थंडावली

कमजोर बनलेले युरोपीय बाजार, रिलायन्सची वार्षिक कामगिरी जरी चांगली असली तरी नैसर्गिक वायूच्या उत्पादनांतील घसरणीने भविष्यविषयक निर्माण झालेल्या चिंतेचे सावट बुधवारी शेअर बाजारावर जाणवले.

| April 18, 2013 12:35 pm

कमजोर बनलेले युरोपीय बाजार, रिलायन्सची वार्षिक कामगिरी जरी चांगली असली तरी नैसर्गिक वायूच्या उत्पादनांतील घसरणीने भविष्यविषयक निर्माण झालेल्या चिंतेचे सावट बुधवारी शेअर बाजारावर जाणवले. त्यामुळे गेल्या अडीच सत्रातील झालेल्या निर्देशांकातील वाढीला उत्तरार्धात नफावसुलीचे ग्रहण लागलेले दिसून आले. परिणामी कालच्या तुलनेत माफक घट दाखवून बाजार बंद झाले.
काल बाजारातील व्यवहार संपल्यावर रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केलेल्या अव्वल निकालांपासून प्रेरणा घेत बुधवारी सकाळच्या सत्रात दोन्ही प्रमुख निर्देशांकवर उघडले. त्यापैकी सेन्सेक्सने ८०.०९ अंशांची कमाई करीत १८,८२५.०२ तर निफ्टीने ३०.४५ अंशांची कमाई करीत ५७१९.४०ची मजल गाठली. परंतु निर्देशांकांतील ही प्रारंभिक उसळी बाजाराला अखेपर्यंत कायम राखता आली नाही. आजच्या बाजाराच्या कारभारादरम्यान दुपारी कमजोरीसह खुल्या झालेल्या युरोपीय बाजारांमुळे आपल्या बाजारात विक्रीला जोर चढल्याचे दिसून आले.
रिलायन्समध्ये विक्रीमुळे सायंकाळी बाजार बंद झाल्यानंतर निकाल जाहीर करणाऱ्या टीसीएसवरही दडपण दिसून आले. रिलायन्स ३.८%, टीसीएस २.११% यांसह एचडीएफसी २.११% हे घटणारे प्रमुख समभाग होते. त्या उलट महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र ४.६९%, स्टरलाइट ४% तर सनफार्मा ३.२२% या वाढणाऱ्या समभागांनी संतुलन साधल्याने, सेन्सेक्स कालच्या तुलनेत १३.७७ अंशांची, तर निफ्टी निर्देशांक जवळपास आहे त्या स्तरावर म्हणजे ०.२५ अंशांच्या नाममात्र घसरणीसह बंद झाला.
रिलायन्सची वर्षांतील मोठी घसरण
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने बुधवारच्या सत्रात चालू २०१३ वर्षांतील सर्वात मोठी म्हणजे ४ टक्क्यांनी आपटी खाल्ली. दिवसअखेर रिलायन्सचा भाव कालच्या तुलनेत ३.८ टक्क्यांच्या घसरणीसह तो ७७४.१० रुपयांवर बंद झाला. निव्वळ नफ्यात ३२ टक्क्यांची भरीव वाढ करून तो ५,५८९ कोटींवर नेणारे अपेक्षेपेक्षा सरस निकाल काल दिल्यानंतरही बाजारात समभागाची ही गत झाली. निकालांकडे बारकाईने कंपनीचे मुख्य व्यवसाय क्षेत्र असलेल्या तेल व वायू क्षेत्राचे महसुली उत्पन्न ३९ टक्क्यांनी घटले असून, परिणामी एकूण वार्षिक उत्पन्न १.४ टक्क्यांनी घटून रु. ८६,६१८ वर आले आहे. विश्लेषकांच्या दृष्टीने ही गंभीर चिंतेची बाब असून, त्या परिणामी समभागात लक्षणीय विक्री दिसून आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2013 12:35 pm

Web Title: slow down of forward move
Next Stories
1 टीसीएस, एचसीएलकडून भरघोस कामगिरी;
2 महाराष्ट्रात साकारणार ‘जपानी गुंतवणूक क्षेत्र’
3 ‘वल्डरू’द्वारे डिजिटल अवकाशात ६ ते १२ वयोगटाच्या नव्या बाजारवर्गाची रुजुवात
Just Now!
X