वृत्तसंस्था, मुंबई

अदानी समूहाने गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान ‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात ‘एनडीटीव्ही’मधील अतिरिक्त भागभांडवली हिस्सेदारी विकत घेण्यासाठी विद्यमान भागधारकांपुढे खुला प्रस्ताव (ओपन ऑफर) ठेवला होता. त्या माध्यमातून अदानी समूहाने ५३ लाख समभाग २९४ रुपये प्रति समभाग या दराने खरेदी केले. आता त्याच भागधारकांना प्रति समभाग ४८.६५ रुपये अतिरिक्त लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

अदानी समूहाने ‘एनडीटीव्ही’मधील बहुतांश भागभांडवली हिस्सेदारी खरेदी करत संपूर्ण मालकी हक्क मिळविला आहे. एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणॉय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय व अन्य प्रवर्तकांकडील समभाग १७ टक्के अधिक अधिमूल्य देऊन गेल्या महिन्यात अदानी समूहातर्फे खरेदी करण्यात आले. अदानी समूहाने रॉय दाम्पत्याकडील उर्वरित ३२.२६ टक्के हिस्सेदारीपैकी २७.२६ टक्के हिस्सेदारी ३४२.६५ रुपये प्रति समभाग दराने खरेदी केली आहे. या बदल्यात रॉय दाम्पत्यांना ६०२ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

अदानी समूहाने हिस्सेदारी थेट विकत घेण्यासाठी तिच्या विद्यमान भागधारकांपुढे ‘ओपन ऑफर’प्रमाणे ठेवलेल्या २९२ रुपये या किमतीपेक्षा १७ टक्के अधिमूल्य ‘एनडीटीव्ही’च्या प्रवर्तकांना दिले होते. म्हणूनच ओपन ऑफरच्या माध्यमातून अदानी समूहाला समभाग प्रदान करणाऱ्या भागधारकांना प्रति समभाग ४८.६५ रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय घेण्यात आला.अदानी समूहातील तीन कंपन्यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीमधील २९.१८ टक्के भागभांडवलाच्या अप्रत्यक्षरीत्या अधिग्रहण केले.

त्यांनतर अदानी समूहाने गेल्या महिन्यात आणखी हिस्सेदारी विकत घेण्यासाठी विद्यमान भागधारकांपुढे खुला प्रस्ताव (ओपन ऑफर) ठेवला होता. रॉय दाम्पत्याकडे अजूनही एनडीटीव्ही ५ टक्के हिस्सेदारी कायम आहे. ‘एनडीटीव्ही’ने बाजार मंचांना दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाची ‘एनडीटीव्ही’मधील हिस्सेदारी आता ६४.७१ टक्क्यांवर पोहोचली आहे.

नियम काय सांगतो?
भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्याअधिग्रहणा संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार, कंपनीच्या अधिग्रहणासाठी प्रवर्तकांना जेवढी किंमत अदा करण्यात आली, तेवढीच किंमत किरकोळ भागधारकांनाही मिळाली पाहिजे, अशी माहिती वित्त सल्लागार कंपनी इनगव्हर्न रिसर्च सव्र्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम सुब्रमण्यन यांनी दिली.