एअरसेलचा मुंबई परिमंडळ विस्तार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />मुंबई परिमंडळातील ग्राहकांना उत्पादने आणि सेवा देऊ करण्याच्या वचनबद्धतेतील पुढचे पाऊल म्हणून देशातील नवागत आघाडीच्या दूरसंचार सेवा पुरवठादारांपकी एक एअरसेलने आर्थिक राजधानीतील सेवा विस्ताराचा मनोदय जारी केला आहे. टुजी तंत्रज्ञानाची सेवा देणाऱ्या या कंपनीने शहरातील आपल्या नेटवर्क साईटमध्ये भर टाकण्याचे निश्चित केले असून दालनांची संख्या वाढविण्याचा मनोदयही जाहीर केला आहे.
सद्य टुजी नेटवर्कमध्ये नव्या साईटची आणि अधिक क्षमतेची भर घालण्याबरोबरच डिसेंबर २०१५ पर्यंत २०० ‘एक्प्रेस स्टोअर्स’ स्थापन कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. ही दालने ‘फ्रँचायझी ओन्ड फ्रँचायझी ऑपरेटेड’ धर्तीची असतील.
एअरसेलच्या मुंबई विभागाचे व्यवसाय प्रमुख आलोक वर्मा यांनी याबाबत सांगितले की, गेल्या वर्षभरात आमच्या ग्राहकसंख्येत १७ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. २०१५ मधील आमच्या दालन व जाळे विस्तार संकल्पामुळे आम्हाला अधिक सक्षम सेवा देणे शक्य होईल. यामुळे मुंबई परिमंडळातील आमचे स्थानही अधिक भक्कम होईल. असेही ते म्हणाले.

‘स्टेमप्युटिक्स’ला ‘स्टेम सेल’साठी अमेरिकेचे पेटंट
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
‘स्टेमप्युटिक्स रिसर्च’ व ‘सिप्ला ग्रूप’च्या सहकार्यातून नव्या स्टेम सेल आधारित औषध ‘स्टेमप्युसेल’ला अमेरिकी पेटंटची मान्यता मिळाली आहे. ‘क्रिटिकल लिम्ब इस्केमिया’ (सीएलआय) हे रक्तवाहिन्यांच्या आजाराच्या प्रकारासाठी हे औषध आहे. या आजारामुळे हातपायांमधील रक्तप्रवाह कमी होतो. हे उत्पादन भयंकर आजारापासून पीडित असलेल्या रुग्णांसाठी प्रगत रोगनिवारक उपचारपद्धती प्रदान करते, असा दावा ‘स्टेमप्युटिक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. मनोहर यांनी केला आहे.

‘ईबे इंडिया’चे लघु उद्योजकांना अर्थसहाय्य
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
आघाडीच्या इ-कॉमर्स व्यासपीठ ईबे इंडियाने लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी भारतातले पहिले ऑनलाइन व्यासपीठ निर्माण केले आहे. ‘एसएमईकॉर्नर डॉट कॉम’च्या भागीदारीबरोबर या व्यासपीठाच्या निमित्ताने या क्षेत्रातल्या उद्योजकांच्या विविध आíथक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विना अडथळा, सहा सुलभ टप्प्यांमधून कर्ज घेण्याचे पर्याय याद्वारे दिले गेले आहेत. यामुळे सततचा पाठपुरावा, ढीगभर कागदपत्रांचे सादरीकरण, व्यावसायिकता न पाळणारे मध्यस्थ घटक अशा अनेक गोष्टी आपोआपच बाजुला होतात. कर्ज पात्रतामापक, कर्ज मासिक हप्तामापक अशी वेगवेगळी मापके असून त्याद्वारे उद्योजकांना घेतलेल्या कर्जाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करता येते. यासाठी सेवा शुल्क आकारले जात नसल्याची माहिती ‘एसएमईकॉर्नर डॉट कॉम’चे संस्थापक-मुख्य कार्यकारी अधिकारी समीर भाटिया यांनी दिली आहे. या भागीदारीमुळे ‘ईबे डॉट इन’वरील जवळपास ५० हजार विक्रेत्यांच्या आíथक गरजा भागणार आहेत, असे ‘ईबे इंडिया’च्या विक्री सेवाचे प्रमुख पंकज उके यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel expanding in mumbai circle
First published on: 10-03-2015 at 06:40 IST