‘सुतारपक्षी विमानसेवा’, ‘गरुड मद्यकंपनी’ अशा उपमांचा वापर करत थेट नामोल्लेख टाळत मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन यांनी मंगळवारी येथे निर्ढावलेले कर्जबुडवे विजय मल्या यांच्या प्रकरणाने संकटाचे रुप धारण करावे यामागे व्यवस्थेचाच दोष असल्याचे प्रतिपादन केले. डबघाईला आलेल्या व्यवसायाचा गाशा रितसर गुंडाळण्याची यंत्रणाच आपल्याकडे नसल्याने कर्जावर कर्ज थकत गेली, अशी त्यांनी मल्या यांच्या व्यवसाय ओहोटीबाबतची कारणमिमांसा मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर व्याख्यानात केली.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2016 रोजी प्रकाशित
मल्याप्रकरणी सुब्रह्मण्यन यांचा व्यवस्थेलाच दोष
सुतारपक्षी विमानसेवा’, ‘गरुड मद्यकंपनी’ अशा उपमांचा वापर करत थेट नामोल्लेख टाळत मुख्य आर्थिक सल्लागार
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 09-03-2016 at 00:10 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind subramanian comment on vijay mallya