ग्रामीण भारतात अखंडित वीजपुरवठय़ासाठी सौरऊर्जा प्रणालीची सुसज्जता असलेली १०० फिरती ग्रंथालये आणि पिण्याच्या पाण्याचा पंप, स्वच्छतागृहे, सुसज्ज ग्रंथालय व सौरऊर्जेवर चालणारे दिवे, पंखे असलेले वर्ग आणि पदपथावरील दिवे अशी सोय असलेली व सरकारचे अनुदान असलेल्या आदर्श शाळा अशा व्यापक उपक्रमाची आखणी बजाज उद्योगसमूहाचा अंग असलेल्या बजाज इलेक्ट्रिकल्सने केली आहे. ‘चाइल्ड फंड इंडिया’शी संधान बांधून कंपनीने सुरू केलेल्या या संयुक्त राष्ट्रीय उपक्रमाचे वैशिष्टय़े म्हणजे त्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्तरावर कार्यरत अशा ६० वेगवेगळ्या सहयोगी भागीदारांना सामावून घेतले जाणार आहे. बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज मुंबईत पत्रकार परिषदेत या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची घोषणा केली. समाजाचे ऋण फेडण्यासाठी कंपन्यांसाठी बंधनकारक असलेल्या सामाजिक दायित्व (सीएसआर) म्हणून राबविल्या जाणाऱ्या अन्य कंपन्यांच्या उपक्रमांना या कार्यक्रमाशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. बंगळुरूमध्ये फिरत्या ग्रंथालयाच्या उपक्रमाची संकल्पना जरी बजाज इलेक्ट्रिकल्सची असली तरी तिचे प्रायोजकत्व अॅक्सिस बँकेने केले. यातून या कार्यक्रमाची व्यापकता आणखी वाढेल, असा विश्वास बजाज यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2015 रोजी प्रकाशित
सौरऊर्जेने उजळलेल्या ग्रामीण शाळा, फिरत्या ग्रंथालयासाठी बजाज इलेक्ट्रिकल्सचा पुढाकार
ग्रंथालयाच्या उपक्रमाची संकल्पना बजाज इलेक्ट्रिकल्सची असली तरी तिचे प्रायोजकत्व अॅक्सिस बँकेने केले.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 25-11-2015 at 02:14 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj electricals joined hand with child fund india towards flagship education programme