किरकोळ तेजीसह २०१३ चा निरोप घेणाऱ्या सेन्सेक्सने नव्या वर्षांची मात्र निराशा केली. २०१४ ची सुरुवात करताना मुंबई निर्देशांक ३०.२० अंशांनी घसरत २१,१४०.४८ पर्यंत आला. २००६ नंतर प्रथमच प्रमुख भांडवली बाजाराने वर्षांची सुरुवात नकारात्मक केली आहे. बुधवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील २.३५ अंश नुकसानासह मात्र ६,३०० च्या काठावर, ६,३०१.६५ स्थिरावला.
वर्षभरात ९ टक्क्यांची घसरण नोंदवित २०१३ च्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स नाममात्र अंशांनी वधारला होता. बुधवारी व्यवहाराची तेजीसह सुरुवात करीत सेन्सेक्स २१,२४४.३५ वर पोहोचला. अनेक जागतिक बाजार नववर्षांनिमित्त बंद असले तरी येथील व्यवहार स्थिर झाले. दिवसाच्या उच्चांकापासून मात्र सेन्सेक्स दिवसअखेर शतकी फरकावर घसरणीने बंद झाला. स्मॉल कॅप व मिड कॅपमध्ये मात्र अनुक्रमे १.५ व ०.४ टक्के वाढ नोंदली गेली.
२ जानेवारी २००६ मध्येदेखील सेन्सेक्स ७.८ अंशांनी घसरला होता. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या आठ महिन्यांमधील वित्तीय तूट व प्रमुख उद्योग क्षेत्राच्या वाटचालीची बाजाराने फारशी दखल घेतली नाही.
रुपयाचेही घसरणीने नववर्ष स्वागत
*भांडवली बाजाराप्रमाणे परकी चलन व्यासपीठावरही भारतीय चलनाने नववर्षांरंभी नांगी टाकली. डॉलरच्या तुलनेत रुपया १० पैशांनी घसरत ६१.९० पर्यंत आला. काल ११ पैशांनी घसरल्यानंतर बुधवारी ६१.८३ अशी किमान सुरुवात करणारा रुपया व्यवहारात ६१.९७ पर्यंत घसरला.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2014 रोजी प्रकाशित
वर्षांरंभ घसरणीने
किरकोळ तेजीसह २०१३ चा निरोप घेणाऱ्या सेन्सेक्सने नव्या वर्षांची मात्र निराशा केली. २०१४ ची सुरुवात करताना मुंबई निर्देशांक ३०.२० अंशांनी घसरत

First published on: 02-01-2014 at 08:13 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex logs first drop on opening trading day in 7 years