बांधकाम क्षेत्रातील सर्वात मोठय़ा व भांडवली बाजार सूचिबद्ध डीएलएफ  या विकासक कंपनीला भारतीय स्पर्धा आयोगाने ठोठावलेला ६३० कोटी रुपयांचा दंड स्पर्धा अपील लवादाने योग्य ठरविला आहे.
उचित व्यवसाय पद्धतीच्या विपरीत, कराराच्या नियम आणि अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीएलएफला ऑगस्ट २०११ मध्ये स्पर्धा आयोगाने ६३० कोटी रुपयांचा दंड जाहीर केला होता. गुरगावस्थित बेलायर ओनर्स असोसिएशनने याबाबतची तक्रार मे २०१० मध्ये आयोगाकडे केली होती. या निर्णयाविरुद्ध कंपनीने अपील लवादाकडे धाव घेतली. लवादानेही हा निर्णय योग्य ठरवीत कंपनीची मागणी धुडकावून लावली. कंपनीने आता याविरोधात येत्या दोन महिन्यांत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे जाहीर केले आहे.