भारतातल्या आíथक बाजारपेठेमध्ये ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंडस’ची (ईटीएफ) वाट मोजक्याच गुंतवणूकदारांनी निवडली आहे. ईटीएफ या एकंदरीत उत्पादनाबद्दलच ग्राहकांना विशेष माहिती नाही. ज्या कोणा मोजक्या जणांना ते माहित आहे त्यांनी थोडय़ा अधिक लोकप्रिय ईटीएफमध्ये म्हणजे ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये गुंतवणूक केली असते. १९८० पासून ईटीएफ भारतात आहेत. पण खऱ्या अर्थाने त्यांची प्रसिद्धी गेल्या १० वर्षांत झाली. जगभरात शेअर्सपेक्षा ईटीएफचा व्यवहार मोठा आहे. मात्र भारतात मात्र ईटीएफभोवती एक गूढ वलय आहे. याचे कारण म्हणजे त्याबद्दल लोकांमध्ये असलेले अज्ञान.
ईटीएफ सेन्सेक्स, निफ्टी, एस अ‍ॅण्ड पी ५००, नॅसडॅक आदींसारख्या इंडेक्सेसचा मार्ग चोखाळतात. जेव्हा एखाद्या ईटीएफचे शेअर्स खरेदी करता तेव्हा प्रत्यक्षात अशा पोर्टफोलिओचे शेअर्स खरेदी करत असतो. जे त्याच्या मूळ इंडेक्सच्या उत्पन्नाचा आणि परताव्याचा मागोवा घेतात. ईटीएफ आणि इतर इंडेक्स फंडमधला मुख्य फरक म्हणजे ईटीएफ कधीच आपल्याविरुद्ध इंडेक्सला झाकोळण्याचा प्रयत्न करत नाही. पण त्याच्यासारखा परफॉर्मन्स मात्र देण्याचा प्रयत्न करतो. म्युच्युअल फंडस किंवा शेअरप्रमाणे ते बाजारपेठेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते स्वत: बाजारपेठ बनण्याचा प्रयत्न करतात.
गुंतवणूकदार बरेचदा विविध कारणांसाठी शेअर बाळगतात ज्यांचा प्रत्यक्ष बाजाराच्या प्रतिसादाशी काहीच संबंध नसतो. पण इतर अंदाजित आणि भावनिक घटकांवर त्यांचा जास्त भर असतो. याबाबतीत ईटीएफवर गुंतवणूकदारांच्या भावनिक आंदोलनांचा किंवा इंडेक्सच्या अंतर्गत अफवांचा काहीच परिणाम होत नाही. ईटीएफ हे त्या शेअर बाजारातल्या इंडेक्स/क्षेत्राच्या परफॉर्मन्सचे एक उत्तम प्रतििबब असते.
अ‍ॅक्टिव्ह फंडसाठी आदर्श जोडी : अ‍ॅक्टिव्ह फंड जसे – म्युच्युअल फंड हे पोर्टफोलिओ फायदेशीर ठेवण्यासाठी ‘अल्फा’ दर्जाची मदत करतात. म्हणजेच एखादा अ‍ॅक्टिव्ह फंड एखाद्या इंडेक्समध्ये जो काही सर्वोत्तम परतावा देतो ते. तर ईटीएफ उत्तम पोर्टफोलिओ सांभाळण्यासाठी त्या खालोखालची म्हणजे ‘बिटा’ पातळीवरची मदत करतात. ही मदत म्हणजे एखाद्या पोर्टफोलिओचा परतावा जो एकंदरीत बाजार परताव्यावर आधारित असतो. लार्ज कॅप विभागात असणाऱ्या पारदर्शकता आणि संशोधनामुळे हे अल्फाचे प्रमाण तीन ते चार टक्क्यांवर आले आहे. जे काही वर्षांपूर्वी १० टक्के इतके होते. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह म्युच्युअल फंड आणि ईटीएफमध्ये समसमान गुंतवणूक केल्यास अल्फा-बिटामध्ये एकवाक्यता येईल आणि पोर्टफोलिओच्या पातळीवर उत्तम जोखीम-समायोजित परतावा मिळेल. त्यावरूनच हे स्पष्ट होते की, गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये केवळ ईटीएफ असण्यापेक्षा तो अ‍ॅक्टिव फंडचा जोडीदार बनल्यास फायदाच होईल. ईटीएफ हे एक अधिक चांगले जोखीम-समायोजित उत्पादने असून यात परतावा हा एकंदरीत बाजाराच्या प्रतिसादावर आधारित असतो.
कमीत कमी ट्रॅकिंग चुका : ईटीएफ हे बाजारपेठेतल्या सर्वोत्तम जोखीम समायोजित उत्पादनांपकी एक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यात ग्राहक एकाच कंपनीत गुंतवणूक न करता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. ज्यांचे इंडेक्सवरचे भार कमी-जास्त आहे. ईटीएफ्सच्या ट्रॅकिंग चुका (पोर्टफोलिओचा आणि इंडेक्स प्रतिसाद यातील तफावतीचे प्रमाण विचलन) फारच कमी असतात. याचाच अर्थ असा की, निफ्टीचा दैनंदिन परतावा २.१८ टक्क्यांनी कमी झाला तर पोर्टफोलिओही तेवढय़ाच किंमतीने खाली जाईल.
इंट्रा-डे ट्रेिडगच्या माध्यमातून बाजाराची क्षमता उपयोगात आणणे : ईटीएफ आपल्या गुंतवणूकदारांना समभाग असल्याप्रमाणे संपूर्ण बाजारामध्ये ट्रेड करण्याची मुभा देते. दिवसातून एकदाच एनएव्हीवर ज्याची किंमत ठरते अशा म्युच्युअल फंडच्या तुलनेत ईटीएफ्स इंट्रा-डेमध्ये व्यवहार करता येतात आणि ते स्वतंत्र रोखे व्यवहाराच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना अल्प मुदतीच्या बाजारातील हालचालींच्या दिशेने अंदाज घेण्याची मुभा देतात.
अभावित व्यवस्थापनामुळे खर्चात कपात : ईटीएफ इंडेक्सचा मागोवा घेतो. त्यामुळे एखाद्या सक्रिय पोर्टफोलिओपेक्षा याचे प्रशासकीय खर्च कमी असतात. अ‍ॅक्टिव्ह फंडसमध्ये (बऱ्याचशा म्युच्युअल फंडप्रमाणे) व्यवस्थापक हा बाजाराला झाकोळून टाकण्यासाठी सातत्याने मालमत्तांचे व्यवहार करत असतो. मात्र ईटीएफचे व्यवस्थापन निष्क्रियतेने केले जाते जिथे प्रसंगानुरूप तडजोडी करून फंड त्याच्या इंडेक्सशी समकक्ष ठेवतो. शेअर्सप्रमाणे ईएफटीसाठी दलाली शुल्क द्यावे लागत नाही. कारण ते दीर्घकालीन गुंतवणूक असतात. ‘अ‍ॅक्टिव्हली मॅनेज्ड म्युचुअल फंड’च्या तुलनेत ईटीएफ ८० टक्के कमी खíचक असतात. व्यवहार करत नाहीत तोपर्यंत त्यापोटी कोणताच खर्च येत नाही, असे ईटीएफबद्दल नेहमीच सूचित केले जाते. त्यामुळे विविधांगी पोर्टफोलिओमध्ये ईटीएफना आजकाल पसंती दिली जाऊ लागली आहे. कमी खर्च आणि कमी भांडवली नफा करांमुळे ईटीएफ बाजारामध्ये अधिक गुंतवणूक करण्याची मुभा देतात. मात्र ईटीएफचे व्यवहार हे दलाल पेढय़ांद्वारे केले जात असल्यामुळे प्रत्येक व्यवहारासाठी मानधन द्यावे लागते. हे टाळण्यासाठी कमी शुल्क घेणाऱ्या संस्था, कंपन्यांमार्फत व्यवहार करावे. अन्यथा ईटीएफमुळे मिळणारा फायदा दलाली शुल्कातच निघून जाईल. खरेदी करून ‘होल्ड’ करणाऱ्या गुंतवणुकदारांनी म्हणजे जे एकाच वेळी मोठी गुंतवणूक करून शांत बसू शकतात अशांनीच ईटीएफमध्ये गुंतवणूक करावी.

(लेखक एडलवाइज अ‍ॅसेट मॅनेजमेन्ट लिमिटेडचे (एएमसी) मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)
ईटीएफना भारतीय गुंतवणूकदारांची
फारशी पसंती का नाही?
अनेक कंपन्या ईटीएफ देऊ करतात; मात्र त्यापकी बऱ्याच जणांचा ‘सेट-अप’ हा ‘अ‍ॅक्टिव्ह फंड’चा आहे. कमी नफा असणाऱ्या उत्पादनांची फारशी शिफारस केली जात नाही. मात्र बाजारात दबदबा असणारे, ‘मार्केट मेकर्स’ म्हणून ओळखले जाणारे, विशेषत: ते ज्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणवर संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत ते ईटीएफच्या मागणीला वेग आणू शकतील.
आणखी एक कारण म्हणजे भारतातले फंड बाजारपेठ ही सल्लागारांवर चालते. ईटीएफना सल्लागारांची बठक नाही. त्यामुळे फंड सल्लागारांना ईटीएफची शिफारस गुंतवणूकदारांना करायची गरज भासत नाही. एकदा का ग्राहकाने ईटीएफचा पर्याय निवडला की दलाल पेढय़ांप्रमाणे त्यांचे ग्राहकावर कोणतेच नियंत्रण राहत नाही.