जगभरात विस्तार असलेली आधुनिक सराफपेढी मलाबार गोल्ड अॅण्ड डायमंड्सने चालू वर्षांत देशभरात ४० नवीन विक्री दालने सुरू करण्याची योजना आखली आहे. त्याची सुरुवात म्हणून कंपनीचे महाराष्ट्रातील पहिल्या आणि जागतिक स्तरावरील ८७ व्या विक्री दालनाचे रविवारी मुंबईत न्यू लिंक रोड, अंधेरी (प.) येथे उद्घाटन झाले. २००६ सालापासून मलाबार गोल्डच्या सदिच्छादूत असलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या हस्ते हे नवीन विक्री दालन सुरू झाले.
कंपनीने आपल्या किरकोळ विक्री जाळ्यात विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतला असून, मुंबईतील शोरूम हे त्याचेच प्रत्यंतर असल्याचे मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांनी सांगितले. यापुढे कुर्ला- मुंबई, पुणे, नाशिक, अहमदाबाद, राजकोट, जयपूर आणि उत्तर भारतातील प्रमुख शहरांमध्ये लवकरच शोरूम सुरू होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चालू वर्षांत नवीन ४० तर २०१६ पर्यंत एकूण विक्री दालनांची संख्या २२० वर नेण्याचे कंपनीचे नियोजन आहे. आखाती देशांव्यतिरिक्त मलाबार गोल्डच्या मलेशिया, सिंगापूर, युरोप आणि अमेरिकेमध्येही विस्ताराचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2013 रोजी प्रकाशित
‘मलाबार गोल्ड’ची २०१६ पर्यंत २२० विक्री-दालनांची योजना
जगभरात विस्तार असलेली आधुनिक सराफपेढी मलाबार गोल्ड अॅण्ड डायमंड्सने चालू वर्षांत देशभरात ४० नवीन विक्री दालने सुरू करण्याची योजना आखली आहे. त्याची सुरुवात म्हणून कंपनीचे महाराष्ट्रातील पहिल्या आणि जागतिक स्तरावरील ८७ व्या विक्री दालनाचे रविवारी मुंबईत न्यू लिंक रोड, अंधेरी (प.) येथे उद्घाटन झाले.

First published on: 10-04-2013 at 03:22 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expansion programme of malabar gold